एक्स्प्लोर
Advertisement
नीरव मोदी म्हणतात लोन माफ करा, धनंजय मुंडे टीका करतात तरीही नरेंद्र मोदी धन्यवाद म्हणतात...
मोदींनी #MainBhiChowkidar मोहीम सुरु करत देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या मोहिमेची खिल्ली ट्विटरवरुन उडवली जात आहे. याचे कारण ठरले ते ट्विटरवरुन ऑटो रिप्लाय होणारे मेसेज.
मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लोन माफ करण्याची विनंती ट्विटरवरुन केली. या विनंतीला नरेंद्र मोदींनी थँक यू म्हणत रिप्लाय दिला. तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली तर त्यांनाही मोदींनी धन्यवाद असा रिप्लाय दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्वत:ला चौकीदार म्हटलं आहे. मात्र यावेळी मोदींनी #MainBhiChowkidar मोहीम सुरु करत देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या मोहिमेची खिल्ली ट्विटरवरुन उडवली जात आहे. याचे कारण ठरले ते ट्विटरवरुन ऑटो रिप्लाय होणारे मेसेज.
#MainBhiChowkidar या हॅशटॅगवर पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या बनावट अकाउंटवरुन नरेंद्र मोदी यांच्याकडे लोन माफ करण्याची विनंती ट्विटरवरुन केली. या विनंतीला नरेंद्र मोदींनी थँक यू म्हणत रिप्लाय दिला. तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली तर त्यांनाही मोदींनी धन्यवाद असा रिप्लाय दिला आहे. हे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यावर धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत, हे बघा 40 पैसे रोजाने आणलेल्या लावारीसांवर जबाबदारी टाकली की हे असं होते! यांना शालजोड्याने हाणली तरी धन्यवाद म्हणतात. मोदी साहेब अशा लोकांवर अवलंबून राहतात म्हणून तुमची जाईल तिथे नाचक्की होते... जरा आवरा स्वतःला सावरा... किती तो मोठेपणा करणार?, अशा शब्दात टीका केली आहे.
राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है'ला मोदींचं उत्तर, #MainBhiChowkidar मोहीम सुरु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्वत:ला चौकीदार म्हटलं आहे. मात्र यावेळी मोदींनी देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार असल्याचं स्पष्ट केलं आहे. चौकीदार देशाची सेवा करत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी जे कुणी मेहनत करतात ते सगळे चौकीदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मै भी चौकीदार हूँ' ही लाईन वापरत आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा, विकास, अस्वच्छता, सामाजिक प्रश्न या विरोधात लढणारा प्रत्येक नागरिक चौकीदार असल्याचं मोदींनी या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं आहे. मी एकटा चौकीदार नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी जे कुणी कठीण परिश्रम करतात ते सगळे चौकीदार आहेत. नरेंद्र मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, आज देशाचा प्रत्येक नागरिक 'मी पण चौकीदार' असल्याचं बोलत आहे. यासाठी मोदींनी #MainBhiChowkidar या हॅशटॅगचा वापर केला आहे. आपल्या ट्वीटसोबत शेअर केलेल्या व्हिडीओत देशातील विविध राज्यातील लोकांना दाखवण्यात आलं आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती या व्हिडीओत देण्यात आली आहे. भ्रष्टाचार विरोधी लढाई सुरुच राहणार असून यामध्ये देशातील प्रत्येक नागरिक आपल्यासोबत असल्याचं मोदींनी म्हटलं. राफेल घोटाळ्यावरुन विरोधक आणि खासकरुन राहुल गांधी नरेंद्र मोदींवर सातत्यानं निशाणा साधत आहेत. राहुल गांधी 'चौकीदार ही चोर है' असं म्हणत मोदीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी भाजपने ही अनोखी शक्कल लढवल्याचं बोललं जात आहे.हे बघा ४० पैसे रोजाने आणलेल्या लावारीसांवर जबाबदारी टाकली की हे असं होते! यांना शालजोड्याने हाणली तरी धन्यवाद म्हणतात???? मोदी शेठ अशा लोकांवर अवलंबून राहता म्हणून तुमची नाचक्की होते. जरा आवरा स्वतःला सावरा... किती तो मोठेपणा करणार? जरा ट्विट व्यवस्थित वाचाhttps://t.co/ELOyxVcS9S pic.twitter.com/4OHuEmm4KV
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement