Majha Sanman 2023 : सन्मान आपल्या माणसांचा, अभिमान महाराष्ट्राचा; आज 'माझा सन्मान पुरस्कार सोहळा', पाहा ABP Majha वर
Majha Sanman 2023 : एबीपी माझाच्या 'माझा सन्मान पुरस्कार' सोहळ्याचे आज संध्याकाळी 8 वाजता एबीपी माझावर प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
मुंबई : दिग्गजांच्या कार्याचा सन्मान यंदाच्या ''माझा सन्मान पुरस्कार'' सोहळ्यात करण्यात आला आहे. याच पुरस्कार सोहळ्याचे प्रेक्षपण आज म्हणजेच, 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 8 वाजता एबीपी माझावर करण्यात येणार आहे. 'माझा सन्मान पुरस्कार' सोहळा हा 21 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि इतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुरस्कार सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यंदाच्या 'माझा सन्मान पुरस्कार'ने ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि सुरेश वाडकर, अमेरिकेतील पाहिले मराठी खासदार श्री ठाणेकर यांच्यासह दहा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे.
सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील लोकांच्या कार्याची दखल एबीपी माझाकडून दरवर्षी घेण्यात येते. अशा गुणीजनांना यंदा देखील 'माझा सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. एबीपी माझाकडून देण्यात येणारा 'माझा सन्मान' 2023 हा पुरस्कार सोहळा आज आणि उद्या म्हणजेच, 26 आणि 27 रोजी एबीपी माझावर पाहता येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
माझा सन्मानने 'या' दिग्गजांचा गौरव
अमेरिकेच्या संसदेत आपला मराठी ठसा उमटवणारे पहिले मराठी खासदार श्री ठाणेदार यांचा 'माझा सन्मान पुरस्काराने' गौरव करण्यात आला आहे. कर्मभूमी जरी त्यांची अमेरिका असली तरी मुंबई आणि बेळगावशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. त्यांना एबीपी माझाच्या 'माझा सन्मान पुरस्काराने' सन्मानित करण्यात आलं आहे.. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून ज्याने ओळख निर्माण केली, असा अस्सल मुंबईकर असलेल्या शार्दुल ठाकुरचा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला आहे. कोल्हापुरेंची नात आणि कपूरांची लेक म्हणून तिने तिच्या अभियनाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. अशी हरहुन्नरी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा सन्मान माझा पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आला आहे.
'माझ्या मराठीचे बोलू कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके' अशा आपल्या मराठीची श्रींमती शब्दश: आपल्या समोर मांडणाऱ्या सुरेश वाघे यांचा सन्मान 'माझा सन्मान पुरस्कार' सोहळ्यात करण्यात आला आहे. किर्तनाचा ध्यास धरत ज्यांनी देशभरातील जवळपास 14 हजार गावांमध्ये किर्तनाची सेवा पुरवली असे किर्तनकार सत्यपाल महाराज यांना कृतज्ञतापूर्वक 'माझा सन्मान पुरस्काराने' गौरवण्यात आलं. नवी पिढी ज्या ज्ञानमंदिरात घडते, त्या ज्ञानमंदिरांना घडवणाऱ्या वारे गुरुजींना एबीपी माझा अत्यंत अभिमानाने 'माझा सन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.
पाच दशकं संगीतविश्वावर आपला अमीट आणि अवीट ठसा उमटवणारे स्वराधीश म्हणजे सुरेश वाडकर यांना देखील कृतज्ञतापूर्वक एबीपी माझाकडून 'माझा सन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. ज्यांच्या शीर्षकगीताने पाच दशकं मुक्त भ्रमंती केली आणि असंख्य ताऱ्यांनी हे नभांगण सजवले असे जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना 'माझा सन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात आला. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या, सिनेमाला श्वास मानणाऱ्या आणि बाईपण खरंच कळलेल्या भारी केदार शिंदे यांना एबीपी माझाच्या पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलं.
'माझा सन्मान पुरस्कार' तुम्ही एबीपी माझाच्या युट्युब आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून देखील पाहू शकता. तसेच या पुरस्कार सोहळ्याचे एबीपी माझा वाहिनीवर देखील प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :