एक्स्प्लोर

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर चिन्ह, नाव शिंदेंकडे; आता शिवसेना भवनही ठाकरेंच्या हातून निसटणार?

Shiv Sena Symbol Crisis: निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना (Shiv Sena) आणि पक्षाच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेलंय. आता शिवसेना भवनही ठाकरेंकडून निसटणार?

Shiv Sena Symbol Crisis: केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) शिवसेना (Shiv Sena) आणि पक्षाच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shiv Sena Symbol) शिंदे गटाला (Shinde Group) दिलं. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षातला (Maharashtra Political Crisis) हा ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यापासूनच शिवसेनेत अंतर्गत फूट पडली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गट (Thackeray Group) असे दोन गट पाहायला मिळाले. दोन्ही गटांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. तसेच, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या. तिथून पुढे ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आणि तिथून या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. अशातच काल (शुक्रवारी) केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. अशातच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर, आता शिंदे गट शिवसेना भवनवरही दावा करणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. 

निवडणुक आयोगाने अखेर मागील आठ महिन्यांपासून सुरु असलेल्या शिवसेना नेमकी कुणाची या संघर्षात एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला. आता शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या शिवसेना भवनासह जवळपास 257 शाखांचं भवितव्य काय? हा सवाल उपस्थित होत आहे. खरंच जर शिवसेना भवन, शिवसेनेचं मंत्रालयासमोरचं कार्यालय शिवालय, विधानभवनातील सेनेचे कार्यालय आणि सामना पेपर, मार्मिक साप्ताहिक यांसारख्या शिवसेनेच्या मालमत्तांवरही शिंदे गटाने दावा केला, तर या सर्व मालमत्ताही शिंदे गटाच्याच ताब्यात जाणार का? जाणून घेऊया सविस्तर... 

मागील जवळपास 8 महिन्यांपासून निवडणूक आयोगात शिवसेना कुणाची? हा लढा अखेर शुक्रवारी संपुष्टात आला आणि एकनाथ शिंदे यांनाच आता शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण मिळालं. मात्र शिवसेना पक्षाकडे असणाऱ्या प्रॉपर्टीचं काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

शिवसेनेच्या मालमत्ता कोणत्या आहेत?

  • शिवसेना भवन
  • शिवसेनेचे मंत्रालयासमोरचे शिवालय हे कार्यालय
  • विधानभवनातील सेनेचे कार्यालय
  • सामना वृत्तपेपर आणि मार्मिक साप्ताहिक

एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील दादर येथे असणारं शिवसेना भवन हे कार्यालय उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. कारण हे कार्यालय शिवाई नावाच्या ट्रस्टच्या नावावर आहे. त्याचे अध्यक्ष लीलाधर ढाके आहेत. तसेच, शिवसेनेचं मुखपत्र असणारं दैनिक सामना, मार्मिक साप्ताहिक या प्रबोधन प्रकाशन या पब्लिक लिमिटेड संस्थेचं असल्यामुळे याचीही मालकीही ठाकरे गटाकडेच असणार आहे. 

कोणकोणत्या गोष्टींवर शिंदे गट दावा करु शकतो?

शिंदे गटाकडे मात्र आता अधिकृतपणे विधानभवनातील शिवसेनेचं कार्यालय, मंत्रालय समोरचं शिवसेनेचं शिवालय हे कार्यालय असणार आहे. राहता राहिला प्रश्न मुंबईतील शाखांचा, तर मुंबईत 227 महापालिकेचे प्रभाग असून प्रत्येक प्रभागात शिवसेनेच्या एकापेक्षा अधिक शाखा आहेत. त्यांची मालकी ठाकरेंकडे असल्यामुळे त्या शाखा मिळवण्याचा शिंदे गटाचा नक्कीच प्रयत्न असेल. एकीकडे शिंदे गटाकडून शिवसेनेच्या म्हणून असणाऱ्या वास्तू ताब्यात घेतल्या जातील. तर दुसरीकडे आत्तापर्यंत शिवसेनेला मिळालेल्या देणगी असेल किंवा पक्ष निधी असेल यावर देखील शिंदे गटाकडून दावा सांगण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शिंदे गटातील नेत्यांना सातत्याने ठाकरे गटाकडून गद्दार असं संबोधलं जात होतं. मात्र तो शिक्का केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे कुठेतरी पुसला गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. राहता राहिला प्रश्न कार्यकर्त्यांचा, तर नेते मोठ्या प्रमाणात शिंदेंकडे असल्यामुळे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडेच जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, याचा थेट परिणाम आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवर होताना पाहायला मिळणार आहे. 

शिवसेना भवनावर दावा करणार नाही; केसरकर, शिरसाट यांची स्पष्टोक्ती

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर, शिवसेना भवनवर शिंदे दावा करणार का? अशा चर्चा रंगलेल्या असताना, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि मंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना भवनावर आम्ही दावा करणार नसल्याची स्पष्टोक्ती शिंदे गटातील दोन्ही आमदारांनी केली आहे. तसेच, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी दोघांनाही आता शिंदे गटानं शिवसेना भवनावर दावा सांगितला तर? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी शिवसेना भवनावर दावा करायला मोगलाई आहे का? असा प्रतिप्रश्नच उद्धव ठाकरेंनी विचारला होता. तसेच, शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा कुठेही जाणार नाहीत. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. 

शिवसेना भवन, सर्व शाखा आमच्याकडेच राहणार : संजय राऊत

शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा कुठेही जाणार नाहीत. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे शिवसेनेला संपवण्यासाठी करण्यासाठी वापरलेलं तंत्र आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

शिवसेना भवनाचा इतिहास

शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. पण सेनाभवन मात्र 1974 साली उभारण्यात आलं. तोपर्यंत मधल्या काही वर्षांच्या काळात शिवसेनेचं कार्यालय पर्ल सेंटरच्या दोन खोल्यांमध्ये होतं. तिथंच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सर्वांना भेटायचे आणि शिवसेनेचं सर्व कामकाज त्याच दोन खोल्यांमधून व्हायचं. सेनाभवन उभारण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान हेसुद्धा कार्यालयासारखंच वापरलं जायचं. शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. तसेच, शिवसेना भवन खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या देखरेखीखाली उभारलं गेलं. महाराष्ट्रातील कोणत्याही प्रादेशिक पक्षाचं इतकं मोठं कार्यालय नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी दरम्यान, चर्चेत असणारं नबाम रेबिया प्रकरण आहे तरी काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Embed widget