इन्स्टाग्रामच्या रीलवरून युपीतील दोन मुलींना शोधण्यात वसई पोलिसांना यश
Maharashtra News : वसईच्या माणिकपूर पोलिसांनी इन्स्टाग्रामच्या क्लिपवरून दोघां मुलींना शोधून, वडिलांच्या स्वाधीन केलं आहे
![इन्स्टाग्रामच्या रीलवरून युपीतील दोन मुलींना शोधण्यात वसई पोलिसांना यश Maharashtra news Vasai police succeed in finding two girls from UP on Instagram reel इन्स्टाग्रामच्या रीलवरून युपीतील दोन मुलींना शोधण्यात वसई पोलिसांना यश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/ba4f581717ce74f5dedd5fc664e50a1a_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईच्या या चंदेरी दुनियेत देशभरातून तरुण मुलं मुली आपलं नशिब आजमावयला येतात. अशाच दोन मुली युपी हून सुपरस्टार बणण्यासाठी आल्या पण या दोन्ही मुली खाजगी कंपनीत कामाला लागल्या. लाईट, पंखा नसलेल्या खोलीत आपला उदारनिर्वाह करत होत्या. वसईच्या माणिकपूर पोलिसांनी इन्स्टाग्रामच्या क्लिपवरून दोघां मुलींना शोधून, वडिलांच्या स्वाधीन केलं आहे.
मुंबईत आपलं नशीब आजमवण्यासाठी दोन मुली उत्तरप्रदेशच्या प्रयागनगर येथून हिंदी चिञपटात काम करण्यासाठी आणि इन्स्टाग्रामवर सुपरस्टार बनण्यासाठी 26 डिसेंबर 2021 रोजी आपलं घर सोडून वसईत आल्या होत्या. मुलींच्या वडीलांनी युपीच्या गणपत पोलीस ठाण्यात मुली बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. युपी पोलिसांनी मुलीची लोकशन तपासल्यानंतर मुंबई जवळच्या वसईचं लोकेशन मिळालं. युपी पोलिसांनी वसईच्या माणिकपूर पोलिसांना संपर्क साधल्यावर माणिकपूर पोलिसांना त्यातील एका मुलीचा इन्स्टाग्रामवरील एक व्हिडिओ क्लिप मिळाली. त्यात एका प्लास्टिकच्या कंपनीच्या स्टिकर मिळाला. त्याच आधारावर पोलिसांनी त्या प्लास्टिकच्या कंपनीत जाऊन एका मुलीला ताब्यात घेतलं. त्यानंतर दुसरी मुलगी देखील सापडली.
या दोघी मुली युपीतून मुंबईत हिंदी चिञपटात काम करण्यासाठी त्याच बरोबर इन्स्टाग्रामवर रील बनवून सुपरस्टार होण्यासाठी घरातून पळून आल्या होत्या. माञ वसईत त्या छोट्या कंपनीत काम करुन, एका छोट्याशा घरात जेथे ना पंखा ना लाईट अशा घरात वास्तव करत होत्या. माणिकपूर पोलिसांनी दोघां मुलींना समज देवून, वडिलांच्या स्वाधीन केलं आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)