एक्स्प्लोर

बोगस मेडिक्लेम पास करणाऱ्या डॉक्टर आणि लॅब चालकांचा भांडाफोड, विमा कंपन्यांकडून लाटायचे दोनशे ते तीनशे पट रक्कम 

Mira Road : बोगस मेडिक्लेम पास करणाऱ्या डॉक्टर आणि लॅब चालकांचा भांडाफोड करण्यात आला आहे. विमा कंपन्यांकडून दोनशे ते तीनशे पट रक्कम लाटली जात असल्याचे तपासात पुढे आले आहे.

Mira Road : क्लेम इन्वेस्टीगेटरच्या निडर्तेमुळे बोगस मेडिक्लेम पास करणाऱ्या काही डॉक्टर आणि लॅब चालकांच्या गोरखधंद्याचा भांडाफोड झाला आहे. यात लॅबच्या टेक्निशनपासून मिरा भाईंदरमधील मोठ- मोठी रूग्णालयेही सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना काळात काही रूग्णालयांनी विमा कंपन्यांना फसवून मोठी माया जमा केल्याचा पोलिसांना संशय आहे. 

क्लेम इन्वेसटीगेटर संजयकुमार दिक्षित हे काही डॉक्टरांचे बोगस मेडिक्लेम पास करत नसल्याने डॉक्टर आणि लॅब मालकांनी त्यांना गाडीतून पळवून नेवून बेदम मारहाण केली. त्यानंतर क्लेम इन्वेस्टिगरने मीरा रोड पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर ही मोठी माहिती समोर आली आहे. 

मेडिक्लेमच्या नावाखाली चालणाऱ्या गोरखधंद्याचा भांडाफोड संजयकुमार दिक्षित यांच्या निडर्तेमुळे आणि प्रामाणिकतेमुळे झाला आहे. संजयकुमार हे नेक्सेस हेल्थ केअर या कंपनीमध्ये नोकरी करतात. ते रूग्णालयामधून आलेल्या ग्राहकांच्या हेल्थ इ्न्शुरन्स पॉलिसीची चौकशी व तपास करुन त्याचा अहवाल नेक्सस या कंपनीला पाठवतात. परंतु, ते बोगस हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम पास करत नव्हते. त्याचाच राग मनात धरुन पेशाने डॉक्टर असेलेल रोहित मिश्रा, शावांश लॅब चालक शिमांचल मिश्रा, एफ-९ हेल्थ केअर लॅबचे चालक राजेश मिश्रा आणि त्यांचा साथीदार कृष्णा उर्फ भरत मिश्रा यांनी संजयकुमार यांना  16 मार्च रोजी भाईंदर येथील आर.बी.के. स्कूलसमोर बोलावलं. त्यानंतर या चौघांनी त्यांना कारमध्ये बसवून आमचे मेडिक्लेम इन्शुरन्स रिजेक्ट का करतो अशी विचारणा करत मारहाण केली. 

मारहाण केल्यानंतर दिक्षित यांच्या तोडांतून मी तुमच्याकडून क्लेम पास करण्यासाठी पैसे घेतले. माझ्या हातून चूक झाली असे स्वतःच्या मोबाईलमध्ये त्यांनी जबरदस्ती रेकॉर्ड करुन घेतलं. याबरोबरच पोलिसांत गेलास किंवा पुन्हा मिरा रोडमध्ये आलास तर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आणि भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ सोडून दिलं, अशी माहिती संजयकुमार दिक्षित यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे. 

मारहाणीच्या घटनेनंतर संजयकुमार दिक्षित यांनी झालेला प्रकार आपल्या वकील मित्राला सांगितला. त्यामुळे त्यांच्या मित्राने त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यावरून दिक्षित यांनी मिरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दिक्षित यांच्या तक्रारीवरून मिरारोड पोलिसांनी अपहरण आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी डॉ. रोहित मिश्रा, शिमांचल मिश्रा आणि कृष्णा उर्फ भरत मिश्रा यांना अटक केली आहे. तर चौथा आरोपी राजेश मिश्रा हा फरार झाला आहे. 

विमा कंपन्यांकडून लाटायचे जास्तीचे पैसे
या प्रकरणातील सर्व संशयीत आरोपी लॅबच्या आधारे खोच्या आजारांचे रिपोर्ट बनवायचे. त्यानंतर डॉक्टर मेडिक्लेम पास करण्याची हमी देवून रूग्णालय सुचवायचे. त्यानंतर टक्केवारीच्या हिशोबात आणि बिलाच्या मुळ रक्कमेत दोनशे ते तिनशे पटीने जास्त रक्कम विमा कंपनीकडून लाटायचे. कोरोना काळात अनेक हेल्थ इन्शुरअन्स पास झाले आहेत. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. 

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 99 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू,तब्बल 19 जिल्ह्यात नव्या बाधितांचा आकडा शून्य

प्रवासावरील सहा महिन्यांपूर्वीचे निर्बंध आजही योग्य आहेत का?, मंगळवारी खुलासा करण्याचे राज्य सरकारला निर्देश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLaxman Hake on Car attack : हाकेंच्या गाडीवर हल्ला; पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशाराTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Embed widget