Kalyan Crime : स्वसंरक्षणासाठी उत्तर प्रदेशमधून आणला गावठी कट्टा; आरोपीला अटक
Kalyan Crime News : एक तरुण गावठी कट्टा घेऊन कल्याण पश्चिम गोविंदवाडी परिसरात येणार असल्याची माहिती कल्याण बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती.
Kalyan Crime News : उत्तर प्रदेशमधून डोंबिवलीत गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे घेऊन येणाऱ्या तरुणाला बाजार पेठ पोलिसांनी कल्याण गोविंदवाडी परिसरातून अटक केली आहे. महेश पवनीकर असे या तरुणाचे नाव असून तो डोंबिवली आजदेपाडा मधील रहिवासी आहे. आपल्यावर हल्ला होणार असल्यानं स्वसरंक्षणासाठी गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस आणल्याचा दावा आरोपीनं केला आहे.
प्रत्यक्षात त्यानं हे कट्टा कशासाठी कोठून आणले याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेश मधून येणाऱ्या आरोपीकडे घातक अग्निशस्त्र सापडून लागल्यानं पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.
एक तरुण गावठी कट्टा घेऊन कल्याण पश्चिम गोविंदवाडी परिसरात येणार असल्याची माहिती कल्याण बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बाजरपेठ पोलिसांनी गोविंदवाडी परिसरात गस्त वाढवत सापळा रचला. महेश पवनीकर हा मंगळवारी पहाटेच्या सुमारास गोविंदवाडी परिसरात आला. पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी महेशला ताब्यात घेत, त्याची झडती घेतली. त्याच्याजवळ विना परवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस आढळून आले.
दरम्यान हा गावठी कट्टा आपण उत्तर प्रदेशमधून आणला असल्याचं सांगतानाच आपला अनेक जणांशी वाद असून या वादातून आपल्यावर हल्ला होण्याची भीती होती. त्यामुळे आपण स्वसंरक्षणासाठी स्वत: उत्तर प्रदेशमधून खरेदी करून आणल्याचा दावा पोलीस तपासात केला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत पिस्तुल जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai : फार्मसीला प्रवेश देतो म्हणून विद्यार्थ्यांची फसवणूक; मुंबईतील प्राध्यापकाला बेड्या
- प्रवीण दरेकर यांच्यानंतर प्रसाद लाड अडचणीत येणार?;करोडपती 'पगारदार' असल्याचा आरोप
- Job Majha: बँक नोट मुद्रणालय आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान या ठिकाणी नोकरीच्या संधी; असा करा अर्ज
- अखेर सांगली बँकेचा 'तो' निर्णय मागे; स्वाभिमानीच्या आक्रमकतेनंतर संचालक मंडळाची माघार