एक्स्प्लोर

Amit Shah Mumbai Tour: केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्यातील सुरक्षेत मोठी चूक; अमित शाहांभोवती संशयास्पद व्यक्तीचा वावर

Amit Shah Mumbai Tour: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात कडेकोट बंदोबस्त असतानाही मोठी चूक झाली असल्याचे समोर आले आहे.

Amit Shah Mumbai Tour: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान (Amit Shah Mumbai Tour) त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली असल्याचे समोर आले आहे. एका खासदाराचा स्वीय सचिव असल्याचे सांगत एका व्यक्ती काही तास अमित शाह (Amit Shah) यांच्याभोवती वावरत होता. या व्यक्तिला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. हेमंत पवार असे या आरोपीचे नाव आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुंबई दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचे आणि वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाती गणरायाचे दर्शन घेतले होते. अमित शाह यांच्या सुरक्षितेची काळजी मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली होती. मुंबई पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांचेही शाह यांच्या सुरक्षितेची खबरदारी घेतली होती. मात्र, या दरम्यान एक व्यक्ती शाह यांच्या भोवती वावरत होती. आपण आंध्र प्रदेशातील खासदाराचे स्वीय सचिव असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला या व्यक्तीवर संशय आल्याने त्यांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. 

मुंबई पोलिसांनी या व्यक्तिला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. आरोपीचे नाव हेमंत पवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी पवार याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

ही चूक नाही तर सतर्कता!

दरम्यान, शाह यांच्या मुंबई दौऱ्यात मोठा कडेकोट बंदोबस्त असताना दुसरीकडे संशयास्पद व्यक्तीचा वावर कसा काय राहिला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी ही सुरक्षेत चूक नसल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांची ही सतर्कता होती. त्यामुळे त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. या आरोपीची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.

फसवणूक करण्याचा हेतू?

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी आरोपी हेमंत पवार हा केंद्रीय गृह खात्याचा सुरक्षा अधिकारी असल्याचे भासवत होता. गृह मंत्रालय/ मिनिस्ट्री आॅफ होम अफेर्स  असे नामनिर्देष असलेली निळया रंगाची आयकार्ड सोबत असणारी रिबीन लावून शासकीय अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली होती. शाह यांच्याभोवती वावरणारा हेमंत पवार हा लोकांची फसवणूक करत होता का, याचाही तपास सुरू आहे. अमित शाह किंवा इतर नेत्यांसोबत मोठी ओळख असल्याचे सांगून तो फसवणूक करत होता का, त्याने आतापर्यंत कितीजणांना गंडा घातला, याचाही तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Rohit Pawar : राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Manoj Jarange Full Speech :  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे  पुन्हा आंदोलनाला बसणार : ABP MajhaSanjay Raut Majha Vision 2024:मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, माझा व्हिजनमध्ये राऊतांचा मोठा दावाGhatkopar Hoarding : अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईसाठी प्राथमिक पाहणीसाठी बीएमसीची टीम घटनास्थळीPM Modi Varanasi :उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पंतप्रधान मोदीचं एनडीए नेत्यांसोबत शक्तिप्रदर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Rohit Pawar : राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Sanjay Raut: आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत
आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Ramayana : 'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
Embed widget