Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचं संकट अधिक गडद, मंगळवारी 1 हजार 377 नवे कोरोनाबाधित, रुग्णवाढीच्या दरातही मोठी वाढ
Mumbai Corona Update : मुंबईमध्ये कोरोनाचं संकट आणखी वाढत असून मंगळवारी थेट 1377 नवे कोरोनाबाधित आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये कोरोनाच्या आकडेवारीत आज (मंगळवारी) कमालीची वाढ होताना दिसत आहे. आज थेट 1 हजार 377 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. सोमवारच्या (27 डिसेंबर) तुलनेत ही आकडेवारी कमालीची वाढलेली आहे. सोमवारी समोर आलेली मागील 24 तासांतील आकडेवारी 809 होती. ज्यामध्ये मोठी वाढ होऊन आज 1377 रुग्ण समोर आले आहेत. शिवाय रुग्णवाढीचा दरही 0.07 टक्क्यांवरुन थेट 0.09 टक्के इतका झाला आहे. वाढत्या आकड्यांमुळे मुंबईकरांना काळजी घेण्याची वेळ आली असून पालिका प्रशासनाची (Mumbai BMC) चिंताही वाढली आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत नवीन 1377 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच साप्ताहिक रुग्णवाढीचा दर ही 0.09 % वर गेला असून रुग्णदुपटीचा दरही 841 दिवसांवर गेला आहे.
मंगळवारी आढळलेली रुग्णसंख्या
28 डिसेंबर, संध्या. 6.00 वाजता
24 तासात बाधित रुग्ण- 1377
24 तासात बरे झालेले रुग्ण-338
बरे झालेले एकूण रुग्ण-748537
बरे झालेल्या रुग्णांचा दर-97%
एकूण सक्रिय रुग्ण-5803
दुप्पटीचा दर-841 दिवस
कोविड वाढीचा दर (21डिसेंबर-27डिसेंबर)-0.09%
- पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वेगाने होईल ते पहावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
- Corona in Mumbai : मुंबईकरांनो अधिक काळजी घेण्याची वेळ आली, कोरोना रुग्णवाढीचा दर वाढतोय
- Exclusive : मुलांच्या लसीकरणाबाबत पडलेल्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर; जाणून घ्या चाईल्ड टास्क फोर्सच्या सदस्यांकडून
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha