एक्स्प्लोर
Maharashtra Politics: राणे पिता-पुत्रात मतभेद? 'युती हवी' म्हणणाऱ्या Narayan Rane यांना पुत्र Nitesh यांचा 'स्वबळा'चा नारा
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना, राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. कोकणात भाजप (BJP) नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) स्वबळाची भाषा करत आहेत, तर त्यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी युतीची (Alliance) भूमिका घेतली आहे. 'सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे... युती व्हावी आणि ऐंशी टक्के पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात,' असं स्पष्ट मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. दुसरीकडे, भाजपने रत्नागिरी-लांजा, सिंधुदुर्ग, सांगली-जत, भंडारा आणि अकोल्यात स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेने (Shiv Sena UBT) पुणे आणि नंदुरबारमध्ये, तर शिंदे गटाने (Shinde Sena) जळगाव-पाचोऱ्यात आणि काँग्रेसने (Congress) गोंदियामध्ये स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. या घडामोडींमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















