Mumbai : मंत्रालयातील बनावट कागदपत्र घोटाळा, उच्चपदस्थ अधिकारी सामील, मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल
Mumbai : आरोपींनी बोगस कागदपत्रांद्वारेसरकारी निधी लाटल्याचाही आरोप या प्रकरणी करण्यात आला आहे.
Mumbai : मंत्रालयातील (Mantralay Fake Document Scam) बनावट कागदपत्र घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी यात सामील असून अधिकारी आणि वकिलाविरोधात मुंबई पोलिसांत (Mumbai Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस कागदपत्रांद्वारे आरोपींनी सरकारी निधी लाटल्याचाही आरोप या प्रकरणी करण्यात आला आहे.
मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी यात सामील
तत्कालीन गृहविभाग उपसचिव किशोर भालेराव यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्र तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक संवेनशील गुन्ह्यात, विशेष सरकारी वकील म्हणून बनावट कागदपत्रांद्वारे वकीलांची नियुक्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय गोपनीय चौकशी करण्यात आली. त्यात किशोर भालेराव हे दोषी आढळले असून त्यांच्यासह विशेष सरकारी वकील शेखर जगताप, श्यामसुंदर आणि शरद अग्रवाल हे सुद्धा सहआरोपी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे गृह मंत्रालयानं किशोर भालेराव यांना निलंबित केलं आहे. कोणतीही सक्षम आणि कायदेशीर मान्यता न घेता, भालेराव यांनी बनावट आदेशपत्र जारी केल्याचं, चौकशी अहवालात उघड झालं आहे.
गँगस्टर छोटा शकील संबंधित खटल्यात बनावट कागदपत्रं
गँगस्टर छोटा शकील संबंधित खटल्यात खोटी कागदपत्रं वापरण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच दरम्यान अनेक संवेदनशील गुन्ह्यात, विशेष सरकारी वकील म्हणून बनावट कागदपत्रांद्वारे वकिलांची नियुक्ती केल्याची माहिती देखील समोर आली आहे. विशेष म्हणजे हीच बनावट कागदपत्रं बार कौन्सिलकडेही सादर करण्यात आली आहेत. संजय पूनामिया यांच्या तक्रारीत सादर केलेल्या कागदपत्रांचा मुंबई पोलिसांनी तपास केला आहे. गृहखात्याच्या अहवालात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. IPC कलम 170, 420, 465, 467, 468, 471, 474 आणि 120B नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा>>
फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या,अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील; जरांगेंचा इशारा