एक्स्प्लोर

फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या,अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील; जरांगेंचा इशारा

Manoj Jarange : अशीच दडपशाही सुरु राहिल्यास, आधी दोन कोटी मराठे एकत्रित आले होते, आता हाक दिल्यास चार कोटी मराठे एकत्रित येऊन पाणी पाजतील, असे मनोज जरांगे म्हणाले. 

सोलापूर : मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा महाराष्ट्रातचा दौरा करत आहेत. दरम्यान, आज ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सोलापुरात बोलतांना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. "फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील. जर अशीच दडपशाही सुरु राहिल्यास आधी दोन कोटी मराठे एकत्रित आले होते, आता हाक दिल्यास चार कोटी मराठे एकत्रित येऊन त्यांना पाणी पाजतील, असे मनोज जरांगे म्हणाले. 

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, "मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात येत असलेल्या कुणबी नोंदींची संख्या आणखी वाढली असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. यापूर्वी 57 लाख नोंदी सापडल्याचा दावा जरांगे यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, आता याच नोंदी वाढल्या असून, आकडा 63 लाखांवर पोहचला असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यासह सुमारे 1 कोटी लोकांना आरक्षण मिळणार आहे. तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सगेसोयरे कायद्यानुसार आरक्षण मिळेल असेही" जरांगे म्हणाले आहेत. 

गोरगरीब मराठ्यांचे मुलं देखील मोठे झाली पाहिजे 

निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठे लागतात, पण यांच्या नेत्यावर बोलले की सगळे तुटून पडतात. पण तुझ्या नेत्याचेचं टांगा पलटी केल्यावर काय करणार?. गोरगरीब मराठ्यांचे मुलं देखील मोठे झाली पाहिजे यासाठी मी लढत आहेत. तुम्हाला नेत्यापेक्षा जास्त जात महत्वाची पाहिजे. पण, जर तुमच्यासाठी नेता मोठा असेल तर जातीकडे येऊ नयेत, असे जरांगे म्हणाले. 

जेलमध्ये टाकल्यास तिथेही आंदोलन करणार....

सत्ता आणि मराठा यांच्यातील काटा म्हणजे मनोज जरांगे पाटील असून, त्याला दूर करा, गुंतवा असे धोरण यांनी घेतले आहे. मला जेलमध्ये घातले तरी तिथेही आंदोलन करणार. जेलमधील मराठ्यांना आरक्षण शिकवेल. मुस्लिम, धनगर हे देखील सोबत घेईन. माझी मान कापली, तरी आता ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मला कोणतेही पद नको, मी आई-बापाला बाजूला केलं. या समाजाने मला आई-बापाची आठवण येऊ दिली नाही, असेही जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Prasad Lad: मनोज जरांगे पाटील बडबडत राहिले तर मराठा समाज त्यांना जागा दाखवेल, फडणवीसांवरील टीकेनंतर प्रसाद लाडांचा पलटवार

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget