Sandeep Deshpande : कोरोना काळात पालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे हाती, सोमवारी सगळं जाहीर करणार; संदीप देशपांडेंचं खळबळजनक वक्तव्य
कोरोना (Corona) काळात मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आणि पेन ड्राईव्ह हाती आल्याचे वक्तव्य मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी केलं आहे.
![Sandeep Deshpande : कोरोना काळात पालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे हाती, सोमवारी सगळं जाहीर करणार; संदीप देशपांडेंचं खळबळजनक वक्तव्य Maharashtra Evidence of the scam that took place in Mumbai Municipal Corporation during the Corona period Says MNS Sandeep Deshpande Sandeep Deshpande : कोरोना काळात पालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे हाती, सोमवारी सगळं जाहीर करणार; संदीप देशपांडेंचं खळबळजनक वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/f8a7e9ae2d9a595c51f07aee8a9d993a1674279506574339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sandeep Deshpande : मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आपण कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह (Pen Drive) ठेवून गेल्याचा माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. या पेन ड्राईव्हमध्ये कोरोना (Corona) काळात मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे. हे सगळं सोमवारी जाहीर करणार असल्याचं संदीप देशपांडेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे, मुंबईकरांची लूट कोणी आणि कशी केली याची माहिती तसेच बँक खात्यांचे पुरावेही असल्याचं देशपांडे यांनी म्हटलं आहे.
Anti Corruption Bureau : ACB कडे तक्रार दाखल करणार
कोरोनाच्या काळात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे असल्याचा पेन ड्राईव्ह हाती लागल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं. हे सगळं जाहीर करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या पेन ड्राईव्हमध्ये बँक खात्यांचे पुरावे देखील असल्याचं त्यांनी सांगितलं. कशा पद्धतीने मुंबईची लूट करण्यात आली हे उघड करणार आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात Anti Corruption Bureau (ACB) कडे करणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.
वीरप्पन गॅंग चा करोना काळातला मोठा घोटाळा सोमवार दिनांक 23जानेवारी ला उघड करणार पुराव्या सहीत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 21, 2023
वीरप्पन गॅंगचा कोरोना काळात मोठा घोटाळा
याचबरोबर संदिप देशपांडे यांनी ट्वीट करत युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे वीरप्पन गॅंगच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला संदिप देशपांडेंनी लागवालाय. वीरप्पन गॅंगचा कोरोना काळातला मोठा घोटाळा पुराव्यासहीत सोमवारी दिनांक 23 जानेवारीला उघड करणार असल्याचे देशपांडेंनी म्हटलं आहे. त्यामुळं आता सोमवारी संदिप देशपांडे नेमकी काय भूमिका मांडणार? त्यांच्याकडे असणारे पुरावे नेमके काय असणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
नेमकं काय म्हणाले संदिप देशपांडे ?
महत्त्वाच्या बातम्या :
बाळासाहेबांनी सुरु केलेली सामना नावाची चळवळ संपलीय, संजय राऊतांची वळवळ राहिलीय : संदीप देशपांडे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)