एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Monsoon Session : 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी एक दमडी नाही ! काँग्रेसची घणाघाती टीका

Maharashtra Assembly Monsoon Session : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नसून शेतकऱ्यांसाठी पुरवणी मागणीत एक रुपयाची तरतूद केली नसल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज असताना शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असून 25 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यास आल्या पण त्यात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरदूत केली नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप त्यांनी केला. 

विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नाना पटोले  म्हणाले की, अतिवृष्टीने गावे उद्धवस्त झाली आहेत. शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले असून जनावरे वाहून गेली आहेत. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची गरज आहे. पण राज्य सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहोत पण सरकार शेतकरी प्रश्नावर बोलण्यास तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला.

पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचीही तरतूद नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने आज मंत्रालयाजवळ पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने सोमवारी आत्महत्या करून आयुष्य संपवले. शेतकऱ्याला मंत्रालयलाच्या सहाव्या मजल्यावर मारहाण करण्यात आली, शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहे पण राज्यातील सरकार आपल्याच मस्तीत वागत असल्याची घणाघाती टीका पटोले यांनी केली. 

प्रति हेक्टर दीड लाखांची नुकसानभरपाई द्या

शेतकऱ्यांना हे सरकार आपले वाटत नाही ही भावना वाढत चालली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये कोरडवाहूसाठी तर बागायती तसेच फळबागासाठी हेक्टरी दीड लाख रुपये दिले पाहिजेत, या मागणीवर आम्ही ठाम आहोत असेही त्यांनी म्हटले. 

रायगडच्या समुद्रात शस्त्रात असलेली एक बेवारस बोट सापडली तर ट्रॅफिक हवालदाराच्या व्हॉट्सऍपवर मुंबईवर हल्ला करणारा मेसेज येतो हे गंभीर आहे. मुंबई शहर हे संवेदनशील शहर आहे, पण हे प्रकार समोर आल्याने मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत  आहेत, राज्य सरकारने या प्रमुख विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे असेही पटोले म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDr. Gauri Kapre Vaidya : ज्यांना फक्त भेटूनच रुग्ण बरा होतो अशा डॉ. गौरी कापरे - वैद्य यांची मुलाखतTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
Embed widget