एक्स्प्लोर

महादेव अॅप सट्टेबाजी प्रकरणी 567 कोटींची जंगम मालमत्ता जप्त, अद्याप 1 हजार लोक अॅपसाठी करयात काम, आरोपपत्रातून समोर

Mahadev App Betting Case: महादेव बुक अॅप प्रकरणाचा तपास करणार्‍या ईडीनं नुकतंच दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे की, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि सिक्युरिटी होल्डिंगसह सुमारे 567 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

Mahadev App Case : महादेव अॅप सट्टेबाजी प्रकरणी (Mahadev App Betting Case) ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 567 कोटींची जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे पोलीस तपासात, हजारो लोक अजुनही अॅपसाठी काम करत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, महादेव अॅप सट्टेबाजी प्रकरणी ईडीकडून 197 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून आरोपींनी अॅपद्वारे 6 हजार कोटी रुपये कमावल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. 

महादेव बुक अॅप प्रकरणाचा तपास करणार्‍या ईडीनं नुकतंच दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे की, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि सिक्युरिटी होल्डिंगसह सुमारे 567 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडी रायपूरनं दाखल केलेल्या 197 पानांच्या आरोपपत्रात पुढे असं दिसून आलं आहे की, सुमारे हजार लोक अजुनही अॅपसाठी काम करत आहेत, जे बहुतेक UAE मध्ये भाड्यानं घेतलेल्या व्हिलामधून कार्यरत आहेत.  

बहुतेक सट्टेबाजी व्हॉट्सअॅप नंबरवरून केली जाते, आरोपपत्रातून समोर 

बहुतेक सट्टेबाजी व्हॉट्सअॅप नंबरवरून केली जाते आणि एजंट, विविध पॅनल बनवून कमिशन तत्त्वावर कॉल सेंटर चालवत आहेत. महादेव बुक अॅपचा मुख्य कार्यालय यूएईमध्ये असून ते मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल चालवतात.  केवळ क्रिकेट सट्टेबाजीवरच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांवर सट्टेबाजीसाठीही या अॅपचा वापर केला जात होता. महादेव बुक अॅपसाठी काम करणारे बहुतेक कर्मचारी छत्तीसगडचे आहेत, जे सौरभ आणि रवी उप्पल यांना ओळखतात आणि ते दुबई आणि यूएईमध्ये स्थायिक झाले आहेत.

यावर्षी ऑगस्टमध्ये महादेव बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं अटक केलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) चंद्रभूषण वर्मा यांनी सांगितलं होतं की, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मित्रानं हवाला व्यवहाराद्वारे पैसे मिळवले होते, ED द्वारे दाखल आरोपपत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

आरोपपत्रानुसार वर्मा यांनी अंमलबजावणी संचालनालयाला सांगितलं की, नागपूरमधून जमा झालेल्या हवाला रकमेतील काही भाग विजय भाटिया, लक्ष्मीनारायण बन्सल, आशिष वर्मा आणि मनीष बनचोर यांना देण्यात आला. विजय भाटिया हे छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे जवळचे मित्र आहेत. आशिष वर्मा आणि मनीष बनचोर हे छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) आहेत.

मनी लॉन्ड्रिंगचं मोठं नेटवर्क उघड

महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडी सातत्यानं छापेमारी करत आहे. तसेच, याप्रकरणी अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. आता याप्रकरणी बॉलिवूड रडारवर आलं आहे. बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सारख्या अनेक मोठ्या नावांचा या प्रकरणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे लग्न सौरभ चंद्राकरचं होतं. सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे. सौरभनं त्याचा मित्र रवी उप्पलसोबत 'महादेव ऑनलाईन अॅप' सुरू केलं होतं. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्याशाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget