एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
20 ऑगस्टपासून मुंबईतील लोअर परेल पुलाचं तोडकाम
पुलाच्या पाडकामासाठी 7.2 कोटींचे टेंडर पश्चिम रेल्वेने मंजूर केले असून उद्यापासून पुलावरील डांबर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई : धोकादायक असलेला लोअर परेल पूल पाडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. येत्या 20 ऑगस्ट म्हणजेच सोमवारपासून या पुलाचं तोडकाम सुरू होणार आहे. हा पूल पाडण्याकरिता तीन महिने लागणार आहेत. या पुलाचे तोडकाम रेल्वे प्रशासन करणार आहे.
मुंबई महानगर पालिकेला 20 ऑगस्टपर्यंत या पुलावरील युटीलिटी वायर्स काढण्यासाठीची मुदत रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. तसेच या पुलाखाली असणाऱ्या घरांनाही 20 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.
पुलाच्या पाडकामासाठी 7.2 कोटींचे टेंडर पश्चिम रेल्वेने मंजूर केले असून उद्यापासून पुलावरील डांबर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान 3 जुलै 2018 रोजी अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाची पादचारी मार्गिका कोसळून अपघात झाला होता. यामुळे दोन जणांना प्राण गमवावे लागले. तर तीन जण जखमी झाले. तसेच लोकल सेवाही मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाली.
यानंतर रेल्वे, पालिका व आयआयटी मुंबईने उड्डाणपुलांच्या केलेल्या सुरक्षा तपासणीत लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक घोषित केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी व पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. पूल बंद होताच परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत आहे.
संबंधित बातम्या
लोअर परेल पुलावर शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
लोअर परेल पुलाच्या बांधकामावरुन महापालिका-रेल्वे प्रशासन आमनेसामने
लोअर परेल पूल बंद, वळसा घालण्याशिवाय पर्याय नाही!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement