एक्स्प्लोर
Lockdown Relaxation in Mumbai : मुंबईत उद्यापासून निर्बंध शिथील; दुकाने खुली करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला
मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सर्व अत्यावश्यक आणि बिगर अत्यावश्यक दुकाने सुरु राहतील. दुकाने सुरु करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला वापरण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सर्व अत्यावश्यक आणि बिगर अत्यावश्यक दुकाने सुरु राहतील. दुकाने सुरु करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर दुसऱ्या बाजूची दुकाने मंगळवार आणि गुरुवार अशी सुरु राहतील. तर शनिवार रविवार आवश्यकतेनुसार दुकाने बंद राहतील.
मुंबईत काय सुरु, काय बंद?
- आवश्यकतेतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत उघडी राहतील. पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजुकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवार उघडी राहतील. तर रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील. पुढील आडवड्यात रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवार उघडी राहतील व रस्त्याच्या उजवीकडील दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील. शनिवार व रविवारी आवश्यकतेतर दुकाने पूर्णत: बंद राहतील.
- ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंबरोबर आवश्यकतेतर वस्तुंचे वितरण करण्यास परवानगी असेल.
- राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले 'ब्रेक-द-चेन' बाबतचे आदेश अस्तित्वात असेपर्यंत हे आदेश लागू राहतील.
- शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.
इतर बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement