(Source: Poll of Polls)
Lata Mangeshkar: मुंबईतील कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचं नाव द्या, मंगेशकर कुटुंबीयांची सरकारकडे मागणी
लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला उषा मंगेशकर (Usha Mangeshkar), मंत्री मंगल प्रभात लोढा आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळी उपस्थित होते.
Lata Mangeshkar: लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मारकाचं आज लता दीदींच्या पहिल्या पुण्यतिथीला भूमिपूजन करण्यात आलं. हे स्मारक मुंबईमधील हाजी अली चौक येथे उभारण्यात येणार आहे. यावेळी स्मारकाच्या भूमिपूजनाला उषा मंगेशकर (Usha Mangeshkar), मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळी उपस्थित होते.
स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी उषा मंगेशकर म्हणाल्या की, 'लता दीदींच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले, याचा खूप आनंद होत आहे. मुंबईत बांधल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला लतादीदींचे नाव देण्यात यावे, अशी विनंती आम्ही राज्य सरकारकडे करतो.'
लता मंगेशकर यांचे भव्य स्मारक मुंबई बीएमसीकडून मुंबईमधील ताडदेव येथील हाजीअली चौक येथे बांधले जाणार आहे. या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबातील इतर सदस्यांनी हजेरी लावली. तसेच शिवाजी साटम, सुदेश भोसले आणि नितीन मुकेश यांसारखे चित्रपट कलाकार देखील भूमिपूजनाच्या कार्यक्रमला उपस्थित होते.
लता मंगेशकर यांच्या स्मारकासाठी बीएमसीचे 50 लाखांपर्यंतचे बजेट आहे. येत्या 6 महिन्यात या स्मारकाचे काम पूर्ण होईल, असं म्हटलं जात आहे. लता मंगेशकर यांच्या स्मारकाला 'सुरांचा कल्पवृक्ष' असे नाव देण्यात येणार असून, त्यासोबतच आकाश आणि धरती या नावानेही ते ओळखले जाणार आहे. महत्त्वाच्या दिवशी या स्मारकामध्ये स्पीकरवर लता मंगेशकर यांची गाणीही लावली जाणार आहेत.
लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज (6 फेब्रुवारी) पहिली पुण्यतिथी आहे. लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त कलाकार सुदर्शन पटनायक यांनी 6 फूट उंच वाळूचे शिल्प तयार केले आहे. 'मेरी आवाज ही पहचान है' असं लिहिलेलं दिसत आहे. या वाळू शिल्पाचे फोटो ANI च्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत.
On the occasion of the first death anniversary of Lata Mangeshkar, sand artist Sudarsan Pattnaik created a 6ft high sand sculpture with the message 'Tribute to Bharat Ratna Lata Ji, Meri Awaaaz Hi Pehechan Hai', at Puri beach in Odisha (05.02) pic.twitter.com/IeqtWTbvPh
— ANI (@ANI) February 6, 2023
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: