एक्स्प्लोर
Advertisement
काळाचौकी येथे चाळीतील घर खचले ; ४ जण थोडक्यात बचावले
वडाळा येथील रस्ता खचल्याची घटना ताजी असताना काळाचौकीतही घरातील जमीन खचण्याचा प्रकार समोर आला आहे. काळाचौकी भागातील अभ्युदय नगरमध्ये वेस्टर्न इंडिया चाळीत घरात जमीन खचल्याने मोठा खड्डा तयार झाला आहे.
मुंबई : वडाळा येथील रस्ता खचल्याची घटना ताजी असताना काळाचौकीतही घरातील जमीन खचण्याचा प्रकार समोर आला आहे. काळाचौकी भागातील अभ्युदय नगरमध्ये वेस्टर्न इंडिया चाळीत घरात जमीन खचल्याने मोठा खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्यात 4 जण अडकले होते. स्थानिकांनी आणि पोलिसांनी शिडी आणि दोरीच्या साहाय्याने या चौघांना खड्ड्याबाहेर काढले आहे.
काळाचौकी येथील वेस्टर्न इंडिया चाळीत एका घरात लेथ मशीनवर 4 जण काम करत होते. मशीनवर काम करत असताना अचानक जमीन खचली आणि चौघेही खड्ड्यात अडकले. आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी चौघांना सुखरुप बाहेर काढले.
सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आणि अग्निशमन दलाने शेजारचं एक घर आणि हॉटेल तात्काळ रिकामं केलं आहे.
भिंत खचून सहा वाहनांचं नुकसान
वडाळ्यात तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे लॉयेट्स इस्टेट इमारतीच्या पार्किंग भागातील भिंत खचल्याची घटना घडली होती. या घटनेत सहा वाहनांचे नुकसान झाले होते. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भिंत खचल्यानंतर याप्रकरणी दोस्ती बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक गरोडिया, किसन गरोडिया राजेश शहा अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावं आहेत. दोस्ती बिल्डरनं व्हायब्रेटरच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
राजकारण
परभणी
क्राईम
Advertisement