एक्स्प्लोर

सोमय्या ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात; संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut Press Conferance : सोमय्या ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात, असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला आहे.

Sanjay Raut Press Conferance : आमच्या हातातली हिंदुत्त्वाची गदा योग्य वेळी फिरेल आणि ज्यांच्या डोक्यावर आपटायची आहे, त्यांच्या डोक्यावर जाऊन आपटेल, असं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टीकाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. जे अस्वस्थ नेते आहेत, अशांत नेते आहेत, त्यांनी आपल्या घरी हनुमान चालिसाचं (Hanuman Chalisa) पठण करावं, त्यांच्या मनाला शांती मिळेल असाही खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यासोबत किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे. 

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत म्हणाले की, "देशात कोणत्या प्रकारचं वातावरण आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ज्या पद्धतीने वापर केला जातो, न्यायालयांवर दबाव आणला जातो, विरोधी पक्ष अनेक राज्यांमध्ये कशाप्रकारे दहशतीखाली आहे. याबाबत, मानवी हक्कांसंदर्भात जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ते कोणत्या हिटलशाहीविषयी बोलत आहेत हे समजून घ्यावं लागेल.", असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना लोकशाहीची इतकी चिंता आहे तर त्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करु आणि त्यांनी भूमिका मांडली आहे ती फक्त महाराष्ट्रापुरती नसून राष्ट्रीय स्तरावरची असू शकते. कारण संपूर्ण देशात हुकुमशाही निर्माण झाली आहे का? अशी चिंता सर्वांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला असेल. आम्ही त्यांच्याशी बोलू"

कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून..., राऊतांचा सोमय्यांना टोला 

"महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरे, शरद पवारांना ओळखतात, त्यांना इतकं लोकशाहीवादी सरकार संपूर्ण देशात नाही हे कळेल. विरोधकावंर हल्ले म्हणजे काय? कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.", असं संजय राऊत म्हणाले. 

"उत्तर प्रदेशात गेल्या तीन महिन्यात 17 खून आणि बलात्कार झाले आहेत. हिटलरशाही, हुकूमशाही, कायदा सुव्यवस्था कोसळणं काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आसाम सरकारने गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना नरेंद्र मोदींबाबत ट्वीट केल्याप्रकरणी अटक करुन सुटका कल्यानंतर पुन्हा अटक केली. हे नेमकं कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे? यावरही फडणवीसांनी मनमोकळं केलं पाहिजे. कारण त्यांना ही लोकशाहीची उबळ आली आहे ती राष्ट्राच्या हिताची आहे.", असं संजय राऊत म्हणाले. 

महाराष्ट्र भाजपचे नेते लोकशाहीवर प्रवचन झोडतायत : संजय राऊत 

संजय राऊत म्हणाले की, "भाजपची भूमिका लोकशाहीवादी आहे. भाजपचे नेते महाराष्ट्रात ज्यांचं नेतृत्त्व नरेंद्र मोदी करत आहेत, अशा पक्षाचे लोक लोकशाहीविषयी प्रवचनं झोडत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. मला देवेंद्र फडणवीसांचं कौतुकही आहे. कालच शरद पवारांनी चांगलं वक्तव्य केलं आहे. सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकलं नाही, येण्याची प्रबळ इच्छा होती, उबळही होती, तरी सत्तेत येऊ शकले नाही. त्यामुळे जी अस्वस्थता आहे, त्यातून विरोधी पक्षाच्या लाऊडस्पीकरमधून वक्तव्यं बाहेर पडत आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे." 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat on Justice Chandiwal | अनिल देशमुखांना क्लीनचिट देण्याचा प्रश्नच येत नाहीPravin Darekar Chandiwal Commission| देशमुखांवर सत्तेचा दबाब, चांदिवाल आयोगावर दरेकरांची प्रतिक्रियाSalil Deshmukh on Chandiwal Commission |अनिल देशमुखांना क्लीनचिट नाही, सलील देशमुख काय म्हणाले?Justice Chandiwal EXCLSUIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
Embed widget