एक्स्प्लोर
मुलाची लग्नपत्रिका उद्धव ठाकरेंनी नाकारली : सोमय्या
मुंबई: राजकारण आणि कौटुंबिक संबंध वेगळे असतात. मात्र उद्धव ठाकरे तेच विसरले. माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मला त्यांच्या घरी जायचं होतं, मात्र उद्धव ठाकरेंनी नकार दिला. असं म्हणत हळवे झालेल्या किरीट सोमय्या यांनी, म्हणूनच आपल्याला मुंबईला माफियामुक्त करायचं आहे, असा निर्धार व्यक्त केला.
मुंबई महापालिका, पारदर्शकता, शिवसेनेसोबतची युती आणि भाजपची स्ट्रॅटेजी याबाबत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी 'माझा कट्टा'वर दिलखुलास गप्पा मारल्या.
'मुलाची लग्नपत्रिका द्यायची होती'
या वर्षभरात उद्धव ठाकरे आणि तुमचं काही बोलणं, हाय-हॅलो झालं का, असा प्रश्न सोमय्यांना विचारण्यात आला. त्यावर सोमय्या म्हणाले, "माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मला त्यांच्या घरी जायचं होतं, मात्र उद्धव ठाकरेंनी नकार दिला. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं दूरचं आहे. राजकारण आणि कौटुंबीक संबंध त्यांना समजले नाहीत. त्यामुळे मुंबई माफियामुक्त करणं हेच माझं ध्येय आहे".
पत्नीला सेनाभवनाजवळ उमेदवारी देऊ
भाजपने जर आदेश दिला, तर मी माझ्या पत्नीला शिवसेना भवनातून उमेदवारी देऊन, त्यांना चॅलेंज देऊ, पण मागे हटणार नाही, असंही सोमय्या म्हणाले.
महापौरपद ध्येय नाही
मुंबईचं महापौरपद हे भाजपचं ध्येय नाही, तर मुंबईला माफियामुक्त करणं आणि पारदर्शी कारभार देणं हे ध्येय असल्याचं सोमय्यांनी नमूद केलं.
आर्थिक सर्व्हे अहवाल का आवडला?
शिवसेना नेते हे अरुण जेटलींचा अर्थसंकल्प बोगस म्हणतात, मग यांना आर्थिक सर्व्हे अहवाल का आवडला? असा सवाल सोमय्यांनी केला. मुंबई पालिका देशात पारदर्शी कारभारात अव्वल असल्याचं आर्थिक सर्व्हे अहवालातून समोर आलं आहे.
कर वसुलीत शिवसेनेची पारदर्शकता आहे, पण विकासकामात, टेंडरमध्ये ही पारदर्शकता का नाही?, असाही सवाल सोमय्यांनी केला.
उद्धव ठाकरे, राहुल शेवाळेंची हिम्मत कशी होते?
मी गेल्या दोन वर्षांपासून मुंबईच्या विकासाबाबत आवाज उठवला. मी डंपिंग ग्राऊंडचा घोटाळा बाहेर काढला, तेव्हा शिवसेना नेते रामदास कदम यांनी माझा बाप काढला. उद्धव ठाकरे आणि राहुल शेवाळेंना आम्ही पारदर्शकता दाखवू. डंपिंग ग्राऊंड बंद करायला सांगूनही, सुरुच ठेवण्याची उद्धव ठाकरे आणि राहुल शेवाळेंची हिम्मत कशी होते? असा सवाल सोमय्यांनी केला.
क्षमता असल्यास नातेवाईकांना तिकीट का नाही?
भाजपमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात येत आहे. त्याबाबत विचारलं असता, सोमय्या म्हणाले, "एखादा क्षमता असलेला व्यक्ती केवळ राजकारण्यांचा नातेवाईक आहे म्हणून त्याला डावलणं चुकीचं होईल. सध्याच्या तरुणाईत क्षमता आहे, पण ते राजकारणात येण्यास इच्छुक नाहीत. काही ठिकाणी क्षमता असलेले उमेदवार मिळाले, पण ते राजकीय नेत्यांचे नातेवाईक होते. "
माझा कट्टावरील महत्त्वाचे मुद्दे
माझा कट्टा- बजेट बोगस म्हणणाऱ्यांना आर्थिक सर्व्हे अहवाल का आवडला?: किरीट सोमय्या
माझाकट्टा- कर वसुलीत शिवसेनेची पारदर्शकता, मग विकासकामात, टेंडरमध्ये का नाही?: किरीट सोमय्या
#माझाकट्टा- कर वसुलीत शिवसेनेची पारदर्शकता, मग विकासकामात, टेंडरमध्ये का नाही?: किरीट सोमय्या
#माझाकट्टा- कर वसुलीत शिवसेनेची पारदर्शकता, कर गोळा करता, मग खर्च का नाही? : किरीट सोमय्या
#माझाकट्टा- उद्धव ठाकरे आणि राहुल शेवाळेंना आम्ही पारदर्शकता दाखवू : किरीट सोमय्या
#माझाकट्टा- उद्धव ठाकरे आणि राहुल शेवाळेंना आम्ही पारदर्शकता दाखवू : किरीट सोमय्या
#माझाकट्टा- गेल्या दोन वर्षांपासून मुंबईच्या विकासाबाबत आवाज उठवला : किरीट सोमय्या
#माझाकट्टा- नातलगांसाठी लॉबिंग नाही, ज्याच्यात क्षमता आहे, त्याला उमेदवारी : किरीट सोमय्या
#माझाकट्टा- आजच्या पीढीला राजकारण घाणेरडं वाटतंय : किरीट सोमय्या
#माझाकट्टा- माझ्यावर हल्ले करणारे सर्व शिवसैनिक होते : किरीट सोमय्या
#माझाकट्टा- सोमय्या बोगस होता, तर तुम्ही तीन बस भरुन गुंड का पाठवले: किरीट सोमय्या
#माझाकट्टा- मी डंपिंग ग्राऊंडचा घोटाळा बाहेर काढला, तेव्हा शिवसेना नेत्याने माझा बाप काढला : किरीट सोमय्या
#माझाकट्टा- शिवसेनेची माफियागिरी आम्हाला मान्य नाही : किरीट सोमय्या
#माझाकट्टा- डंपिंग ग्राऊंड बंद करायला सांगूनही, सुरुच ठेवण्याची उद्धव ठाकरे आणि राहुल शेवाळेंची हिम्मत कशी होते?: किरीट सोमय्या
#माझाकट्टा- किरीट सोमय्या हा माफियांचा कर्दनकाळ: किरीट सोमय्या
#माझाकट्टा- महापौरपद नव्हे, मुंबई मनपाची कार्यपद्धती सुधारणं आवश्यक : किरीट सोमय्या
#माझाकट्टा- मुंबई मनपा सोन्याचं अंडं देणारी कोंबडी, अंड खा, कोंबडी कापू नका: किरीट सोमय्या
#माझाकट्टा- मुंबईत मराठी अस्मिता बाळासाहेबांमुळेच जन्माला आली : किरीट सोमय्या
#माझाकट्टा- मुंबई मनपा सोन्याचं अंडं देणारी कोंबडी, अंड खा, कोंबडी कापू नका: किरीट सोमय्या
#माझाकट्टा- मुंबई माफियामुक्त अभियान संपल्यानंतर, सिंचन घोटाळ्याकडे पुन्हा लक्ष देणार: किरीट सोमय्या
#माझाकट्टा- सिंचन घोटाळ्याची लिंक कुठे जात होती, ते 21 फेब्रुवारीपर्यंत कळेल : किरीट सोमय्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement