BJP vs Shiv Sena LIVE : राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 29 एप्रिलला जामीनावर सुनावणी
Kirit somaiya Maharashtra Mumbai Latest News Updates : आज महाराष्ट्र आणि मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याचं कारण आहे भाजप आणि शिवसेनेत काल झालेला भीषण राडा.
LIVE
Background
Maharashtra Mumbai Latest News Updates : आज महाराष्ट्र आणि मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याचं कारण आहे भाजप आणि शिवसेनेत काल झालेला भीषण राडा. काल झालेल्या गोंधळानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याआधी राणांनी पंतप्रधानांचा दौरा असल्यानं आंदोलन वापस घेत असल्याचं सांगितलं. मात्र नंतर त्यांना अटक केल्यानं गोंधळ वाढला. भाजप नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला गेले आणि तिथं शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात आज पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळं भाजप-शिवसेनेतील गोंधळ आणि पंतप्रधानांचा दौरा याकडे आज दिवसभर लक्ष लागून असणार आहे.
राणा दाम्पत्याला अटक, आज कोर्टात हजर करणार
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच तापलं आहे.
'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने मागे घेतली. परंतु या वादावर पडदा न पडता त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरातून अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली.
किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला, आज काय पडसाद उमटणार
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी शिवसैनिकांनी हल्ला केला. या प्रकरणी आता शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले असून आज दिवसभर यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकाच कार्यक्रमात
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून आज संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित दिसणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 80 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
खासदार नवनीत राणा यांची तब्येत खालावली
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात नेण्यात आले. यामध्येच आता नवनीत राणा यांची तब्येत खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांना भायखला कारागृहाच्या रुग्णालयात दाखल असल्याची माहीती आहे. थोड्याच वेळात त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्या सोवमारी केंद्रीय गृहमंत्र्यांची घेणार भेट
शनिवारी झालेल्या घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या सामोवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहोत. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार मंगल प्रभात लोढा, मिहीर कोटेचा, आशिष शेलार आणि मनोज कोटक हे महत्वाचे नेते देखील उपस्थित असणार आहे.
राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल--जयंत पाटील
विरोधकांचे आता सगळे उपाय थकले त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लावायची असा त्यांचा प्रयत्न दिसतोय पण असं केलं तर महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं. ज्यांच्या पुढाकाराने हे चालू आहे त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरेल असेही त्यांनी म्हटलंय.
राणा दाम्पत्याविरोधात सरकारी पक्ष 27 एप्रिलला युक्तीवाद करणार, लेखी म्हणणं मांडणार : सरकारी वकील प्रदीप घरत
#BreakingNews राणा दाम्पत्याविरोधात सरकारी पक्ष 27 एप्रिलला युक्तीवाद करणार, लेखी म्हणणं मांडणार; सरकारी वकील प्रदीप घरत यांची माध्यमांना माहिती #Maharashtra https://t.co/jIDRW38kqR pic.twitter.com/K9OGaLzN9b
— ABP माझा (@abpmajhatv) April 24, 2022
राणा दाम्पत्याच्या जामिनावर 29 एप्रिलला सुनावणी, तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार
#BreakingNews राणा दाम्पत्याच्या जामिनावर 29 एप्रिलला सुनावणी होणार, तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार, तोपर्यंत रवी राणांचा आर्थर रोड कारागृहात मुक्काम, तर जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा कारागृहात #Maharashtra @ameyrane85 https://t.co/XV8IsdDHw3 pic.twitter.com/BX47Y3GpWo
— ABP माझा (@abpmajhatv) April 24, 2022