एक्स्प्लोर
Advertisement
पाळणाघर मारहाण: मालकिणीसह पतीला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी
मुंबई: खारघरमधील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणाघरात चिमुकलीला बेदम मारहाणप्रकरणी, मालकीण प्रियांका निकम आणि तिचा पती प्रविण निकम यांना आज पोलिसांनी अटक केली असून दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, खारघर पोलिस स्टेशनमध्ये मालकीण प्रियांका निकम आणि आया अफसाना शेख यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय आहे घटना?
खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या ठिकाणी काही चिमुकली पाळणाघरात आहेत. पाळणाघरातील आया अफसाना नासीर शेखने रितीशा नावाच्या दहा महिन्यां चिमुकलीला क्रूरपणे मारहाण केली होती. ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाली होती.
पोलिसांचा हलगर्जीपणा
पोलिसांनी या तपासात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याच्या आरोपही करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल बारा तास लावले होते. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. उलट पोलिस स्टेशनमधील धोपटे साहेब म्हणाले की, तुम्हाला ज्यांच्याकडे माझी तक्रार करायचीय, त्यांच्याकडे करा, मी कोणालाही घाबरत नाही, असा आरोप मुलीची आई रुचिता सिन्हाने केला आहे. शिवाय, कोपरा गावातील स्थानिक आरोपीला मदत करत असून, स्थानिक गुंडाच्या पीडित मुलीच्या पालकांना धमक्याही देण्यात आल्या होत्या.
पाळणाघरातील चिमुकल्यांना ड्रग्ज किंवा गुंगीचं औषध दिलं?
पाळणाघरातील चिमुकल्यांना काहीतरी ड्रग्ज किंवा गुंगीचं औषध दिलं जात असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला होता. कारण चिमुकलीला मारहाण होत असताना इतर लहान मुलं शांत, चिडीचूप झोपलेली होती.
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंकडून दखल
दरम्यान, पाळणाघरात चिमुकलीला केलेल्या मारहाणविषयी मंत्री पंकजा मुंडेंनी संताप व्यक्त केला होता. “हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे. हे पाळणाघर खासगी होतं की त्यासाठी त्यांनी कोणती परवानगी घेतली होती, याची चौकशी करण्यात येईल. तसेच इथे नियमांचं उल्लंघन झालं का याबाबतही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित महिलेवर कडक कारवाई केली जाईल. तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांशीही बोलून मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालणार आहे.” अशी प्रतिक्रिया तेव्हा पंकजा मुंडेंनी दिली होती.
संबंधित बातम्या:
पाळणाघर मारहाण : मालकीण आणि आयावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
पाळणाघरातील प्रकार घृणास्पद, या प्रकरणात स्वत: लक्ष घालणार: पंकजा मुंडे
पाळणाघरातील मारहाण प्रकरणी पोलिसांचा हलगर्जीपणा उघड
VIDEO: दहा महिन्याच्या चिमुकलीला पाळणाघरात अमानुष मारहाण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement