एक्स्प्लोर

Kala Ghoda Arts Festival : काळा घोडा महोत्सव, पर्यटकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बचत गटांच्या उत्पादनांची भुरळ

Kala Ghoda Arts Festival 2025 : काळा घोडा महोत्सवात 18 बचत गट सहभागी झाले असून त्यांनी तयार केलेली वेगवेगळी उत्पादने विक्रीस ठेवण्यात आली आहेत. 

Kala Ghoda Arts Festival 2025 : मुंबई महानगरातील फोर्ट परिसरात सध्या काळा घोडा कला महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण मुंबईसह देशभरातील पर्यटक येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांनी देखील या  महोत्सवात दालन प्रदर्शित केले आहेत. महिलांनी कलाकुसरीने आणि मोठ्या कौशल्याने तयार केलेली विविध आभूषणे, संसारोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहेत. या निमित्ताने बचत गटांतील महिलांनाही उत्पन्न मिळत आहे.   

कलाकारांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मुंबईतील काळा घोडा महोत्सव हा विशेषत्वाने ओळखला जातो. या महोत्सवाच्या माध्यमातून नवकलाकारांना सतत उर्जा मिळत असते. यंदा शनिवार, दिनांक 25 जानेवारी 2025 पासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे. रविवार, दिनांक 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात मुंबईसह देशभरातील कलाकारांनी आपली कलादालने प्रदर्शित केली आहेत. 

महापालिकेकडून महिला बचत गटांना व्यासपीठ

गरजू महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध योजना राबवित असते. महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. या महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पदनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी देखील महानगरपालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.

18 बचत गटांचा सहभाग 

याचाच एक भाग म्हणून काला घोडा महोत्सवातही महानगरपालिकेने या बचत गटांसाठी दालने (स्टॉल्स) उपलब्ध करून दिले आहेत. या महोत्सवात 18 बचत गट सहभागी झाले आहेत. त्यामध्ये बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण, एच पूर्व, एल, एम पश्चिम, एन, एस, पी उत्तर, आर दक्षिण या प्रशासकीय विभागातील बचत गटांचा समावेश आहे. 

महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांनी निरनिराळ्या क्षेत्रात भरारी घेतली आहे. कापड व्यवसाय, आभूषणे, कापडी पिशव्या, खाद्यपदार्थ, गोधडी, शिल्पकला, महिलांसाठीच्या-कार्यालयीन कामकाजाच्या पर्स, बॅग अशी निरनिराळी उत्पादने त्यांनी तयार केली आहेत. काळा घोडा महोत्सवात सहभागी झालेल्या 18 बचत गटांनी फॅन्सी चप्पल, बॅग, गोधडी, लाकूड फेब्रिक ज्वेलरी, सजावटीच्या वस्तू, मुखवास, साबण, तेल, बिस्कीट, आभूषण या प्रकारच्या वस्तू विक्री करणारे दालन उभारले आहेत.

ही बातमी वाचा: 

                  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय, तब्बल 23 वर्षांनंतर 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार 
महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय, तब्बल 23 वर्षांनंतर 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
Shivsena : प्रियंका चतुर्वेदींच्या खासदारकीवरुन आदित्य ठाकरेंवर नाराजी, ठाकरेंचे आमदार-खासदार अस्वस्थ; शिंदेंच्या मंत्र्याचा मोठा दावा
प्रियंका चतुर्वेदींच्या खासदारकीवरुन आदित्य ठाकरेंवर नाराजी, ठाकरेंचे आमदार-खासदार अस्वस्थ; शिंदेंच्या मंत्र्याचा मोठा दावा

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget