एक्स्प्लोर
जिओला 'टेलीनॉर'ची टक्कर, फक्त 47 रुपयात 56 जीबी डेटा
मुंबई: टेलिकॉम कंपनी 'टेलीनॉर'नं भारतात आपला नवा डेटा प्लान लाँच केला आहे. टेलीनॉर आपल्या ग्राहकांना अवघ्या 47 रुपयात तब्बल 56 जीबी 4जी डेटा देणार आहे. हा प्लान 28 दिवसांसाठी वैध असणार आहे. या प्लानमध्ये यूजर्सला 80 पैशात 1 जीबी डेटा मिळेल.
सध्या हा प्लान फक्त इनव्हाइट मिळणाऱ्या यूजर्सनाच घेता येणार आहे. म्हणजेच हा प्लान सध्या invite-only आहे. कंपनी आपल्या खास यूजर्सला यासाठी मेसेज पाठवत आहे. म्हणजेच जोवर तुम्हाला कंपनीकडून इनव्हाइट मेसेज येणार नाही तोवर तुम्ही हा प्लान सब्सक्राईब करु शकत नाही. तसेच हा प्लान टेलीनॉरच्या नेटवर्क सर्कलमध्येच अॅक्टिव्हेट होणार आहे.
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलीनॉरनं हा प्लान आणला आहे. पण या प्लानमध्ये कंपनी फ्री कॉलिंग देणार नाही. टेलीनॉरचा हा प्लान केवळ डेटासाठी असणार आहे. तर दुसरीकडे जिओ 28 जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग देतं. पण जिओ नेटवर्क फक्त VoLTE कॉलच सपोर्ट करतं.
संबंधित बातम्या:
30 GB मोफत डेटा, एअरटेलची जिओच्या नव्या ऑफरला टक्कर
जिओची ‘धन धना धन’ ऑफर नेमकी काय आहे?
व्होडाफोनची नवी ऑफर, 4 जीबी डेटा फ्री!
30 GB मोफत डेटा, एअरटेलची जिओच्या नव्या ऑफरला टक्कर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement