एक्स्प्लोर

Atul Mone Family Pahalgam Attack : पहलगामला कोणतीच सुरक्षा नव्हती, दोन-तीन चॉपरनं जाऊन माणसांना वाचवायला हवं होतं; मोने कुटुंबीयांनी सांगितली हादरवणारी कहाणी

Atul Mone Family Pahalgam Attack : एका चॉपरने काही होत नाही. अजून दोन-तीन चॉपर तिथे जाऊन त्यांनी माणसांना वाचवायला हवे होते, असे अतुल मोने यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

Atul Mone Family Pahalgam Attack : काश्मीरमधील पहलगाम येथे कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेलेल्या अतुल मोने यांच्यासह, संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघा डोंबिवलीकर पर्यटकांचा दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात दुर्दैवी मृत्यू झाला होता. अतुल मोने यांच्या कुटुंबीयांनी पहलगाम दहशतवादाची हादरवणारी कहाणी एबीपी माझाशी बोलताना सांगितली आहे. पहलगामला कोणतीच सुरक्षा नव्हती, दोन-तीन चॉपरनं जाऊन माणसांना वाचवायला हवं होतं, असे त्यांनी म्हटले. 

अतुल मोने यांची मुलगी म्हणाली की, तिथे आम्ही मिनी स्वित्झर्लंडला होतो. सगळं व्यवस्थित सुरू होतं. लोक एन्जॉय करत होते. फोटोज वगैरे काढत होते. आम्ही निघत होतो तेव्हा अचानक गोळीबार सुरू झाला. मला स्वतःला वाटले की नेमकं काय होत आहे? सगळेजण एका दिशेने पळत होते, खाली झोपत होते, मीही तसेच केले. सुरुवातीला त्यांनी दूरवरून गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी लोकांना गोळ्या मारण्यास सुरुवात केली.  आम्ही जिथे सगळे एकत्र होतो, तिथे आम्हाला विचारलं की हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? माझ्या संजय काकांनी हात वरती केला तर त्यांना डोक्यात गोळी मारली. मी त्यांच्या मागेच होते मी हे सर्व बघितले. नंतर हेमंत काका त्यांना विचारायला गेले की, नक्की काय झाले आहे तर त्यांनाही गोळी मारण्यात आली. त्यानंतर माझे बाबा बोलले की, गोळी मारू नका. आम्ही काही करत नाही. तिथे मी, माझी आई होती. मी खूप घाबरली होती. कारण ते गोळी चालवत होते. आई बाबांना कव्हर करायला गेली. पण, त्यांनी बाबांच्या पोटात गोळी मारली, अशी आपबिती तीने सांगितली आहे. 

पहलगामला कोणतीच सुरक्षा नव्हती

हल्ल्यानंतर तिथे लवकर ॲम्बुलन्स पोहोचल्या का? किंवा उपचारासाठी काही प्रयत्न करण्यात आले का? याबाबत विचारले असता अतुल मोने यांच्या पत्नी म्हणाल्या की, आम्ही खाली येत होतो तेव्हा अर्ध्या रस्त्यावर आम्हाला मिलिटरी दिसली. मिलिटरी जे लोक दिसतील त्यांच्याशी बोलत बोलत पुढे जात होते. ते म्हणत होते की, चॉपर वगैरे तिथे गेले आहे. पण, एका चॉपरने काही होत नाही. अजून दोन-तीन चॉपर तिथे जाऊन त्यांनी माणसांना वाचवायला हवे होते, असे आम्हाला वाटते. ते पर्यटन स्थळ असल्याने तिथे सुरक्षा दल हवे होते. तिथे सुरक्षा नव्हती. खाली पोलिसांची सुरक्षा होती. परंतु वरती पर्यटनस्थळी सुरक्षा नव्हती, तिथे सुरक्षा असणे आवश्यक होते, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, त्या ठिकाणी भरपूर गर्दी होती. त्यामुळे किती पर्यटक होते? याबाबतचा अंदाज नाही. पण, जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा सर्वजण तिथून पसरले, असेही त्यांनी म्हटले.  

महाराष्ट्रातील मृतांची नावे-

1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4)  संतोष जगदाळे- पुणे
5)  कौस्तुभ गणबोटे- पुणे
6)   दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे-

1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल

आणखी वाचा 

एकनाथ शिंदेंचा दहशतवादी हल्ल्यानंतर श्रेयवादाचा प्रयत्न, अमित शाहांनी त्यांना समज द्यावी : संजय राऊत

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Goverment On LPG Cylinder Shortage: सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
Stuti Sonawane Death Case Mumbai: अलिबागची ट्रिप, आंबट कँडी आणि छोटा बाथटब...; आयुष्य संपवण्याआधी मुंबईकर स्तुती काय काय म्हणाली?
अलिबागची ट्रिप, आंबट कँडी आणि छोटा बाथटब...; आयुष्य संपवण्याआधी मुंबईकर स्तुती काय काय म्हणाली?
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
Embed widget