एक्स्प्लोर
Advertisement
लग्नानंतर ईशा-आनंद मुंबईतल्या 452 कोटींच्या बंगल्यात राहणार
ईशा अंबानीचे होणारे सासरे अजय पिरामल यांनी ईशा आणि मुलगा आनंद पिरामलला वरळी येथील एक 452 कोटी रुपयांचा बंगला गिफ्ट केला आहे.
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नानंतर तिचा नवा पत्ता अँटालिया ऐवजी वरळी असेल. ईशाचे होणारे सासरे अजय पिरामल यांनी ईशा आणि मुलगा आनंद पिरामलला वरळी येथील एक बंगला गिफ्ट केला आहे. या बंगल्याची किंमत तब्बल 452 कोटी रुपये आहे.
ईशाचे माहेरचे घर मुंबईतले सर्वात महागडे घर म्हणून ओळखले जाते. परंतु तिचे सासरचे घरही कमी नाही. 12 डिसेंबर रोजी आनंद आणि ईशा यांचे लग्न होणार आहे. त्यानंतर हे जोडपे वरळी सीफेसला असलेल्या नव्या घरात शिफ्ट होणार आहे. हे घर तब्बल 50 हजार स्केअर फूट इतके मोठे आहे
आनंद पिरामलचे वडील अजय पिरामल यांनी 2012 साली हिंदुस्तान युनिलिव्हरकडून हा पाच मजली बंगला 452 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यानंतर बंगल्याची डागडुजी केली. काही अधिक बांधकामही केले आहे. त्यामुळे आता या बंगल्याची किंमत 500 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 19 सप्टेंबर रोजी मुंबई महापालिकेने पिरामल यांच्या बंगल्याला सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement