एक्स्प्लोर

मुंबईच्या ब्लॅकआऊटमागे चीनचा सायबर हल्ला, संपूर्ण देशाला अंधारात टाकण्याचा चीनचा कट होता!

गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीच्या चार महिन्यांनंतर मुंबईत अचानक बत्ती गुल झाली. लोकल बंद पडल्या, शेअर बाजार ठप्प झाला, तब्बल दोन कोटी लोक अंधारात होते, कोरोनाच्या संकटात जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयं चालवावी लागली. 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या ब्लॅकआऊट मागे चिनी ड्रॅगनचा हात असल्याचं उघड झालं आहे.

मुंबई : मागील वर्षी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेत भारतीय सैनिकांनी चीनला चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर चीनने भारतात सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. या सायबर हल्ल्याचा संबंध थेट देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काही तास झालेल्या ब्लॅकआऊटशी आहे. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यात संपूर्ण शहरातील बत्ती गुल झाली होती आणि ऐन कोरोनाच्या काळात रुग्णालयं जनरेटरवर कार्यरत होती. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे.

गलवान हिंसेच्या चार महिन्यांनंतर मुंबईत अचानक बत्ती गुल झाल्याने लोकल ट्रेनही बंद पडल्या होत्या. शेअर बाजार ठप्प झाला होता. वीज गेल्याने दोन कोटी मुंबईकर अंधारात होते. रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी जनरेटर सुरु करावा लागले होते, जेणेकरुन व्हेंटिलेटर सुरु राहतील. हा तोच काळ होता, जेव्हा भारतात कोरोना शिखरावर होता.

मागील वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईत ब्लॅकआऊट झालं होतं. आतापर्यंतच्या तपासात ही बाब समोर आली आहे की, या सर्व घटना एकमेकांमध्ये गुंतल्या आहेत. त्यावेळी मुंबईतील ब्लॅकआऊटमागे चीनमधूल झालेला सायबर हल्ला असू शकतो असा दावा भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने काही वृत्तात म्हटलं होतं.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, या सगळ्या घटना चीनच्या एका मोठ्या सायबर अभियानचा भाग होता, ज्याचा उद्देश भारताचा पॉवर ग्रीड ठप्प करणं हा होता. इतकंच नाही चीनने अशी योजना बनवली होती की, जर गलवानमध्ये भारताचा दबाव वाढला तर संपूर्ण देशाला संपूर्ण अंधारात लोटलं जाईल.

मुंबई वीज पुरवठा ठप्प होण्यावरून राज्य सरकारने नेमली चौकशी समिती, दोषींवर कठोर कारवाईचे ऊर्जामंत्र्याचे संकेत

वीज नसल्यानं जनरेटर बंद, व्हेंटिलेटरवरील एका रुग्णाचा मृत्यू,मुलुंडच्या Apex Covid हॉस्पिटलमधील घटना

हिमालयात सुरु असलेल्या कारवायांदरम्यान चिनी मालवेअरने भारतातील वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत घुसखोरी केली होती. यामध्ये हायवोल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन आणि थर्मल पॉवर प्लान्टचाही समावेश होता, असंही न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

चिनी सायबर हल्ल्याचा खुलासा अमेरिकेतील सायबर फर्म रेकॉर्डेड फ्युचरने (Recorded future) केला आहे. पण यातील काही मालवेअर अॅक्टिव्ह झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला. चीनची कंपनी रेड एकोने (Red Echo) सायबर हल्ल्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कशाप्रकारे भारताचे सुमारे एक डझन पॉवर ग्रीड गुपचुप पद्धतीने नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, हे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी स्टुअर्ट सोलोमन यांनी सांगितलं.

मुंबई अंधारात, रुग्णालयं जनरेटरवर मागील वर्षी 12 ऑक्टोबर रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबई जवळपास दोन ते तीन तास अंधारात होती. मुंबई महानगर क्षेत्रात पॉवर ग्रीड यंत्रणेत बिघाड झाला होता. दक्षिण मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टने (BEST) म्हटलं होतं की, वीजपुरवठा करणाऱ्या प्लांटमध्ये बिघाड झाला आहे. याशिवा महावितरणकडून होणारा वीज पुरवठाही खंडित झाला होता. परिणामी मुंबई शहरासह पूर्व, पश्चिम, उपनगर आणि ठाण्यातील काही भागात अंधारात गेले होते. यामुळे अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. बिघाड झाल्याने मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेनही आहे त्या ठिकाणी उभ्या होत्या. तर याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. रुग्णालयातील वीज गेल्याने जनरेटरवर व्हेंटिलेटर आणि अत्यावश्यक सेवा सुरु होत्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget