एक्स्प्लोर
मी महापालिका निवडणूक लढवणार नाही : शुभा राऊळ
मुंबई : मी महापालिका निवडणूक लढणार नाही, असं मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेने नेत्या शुभा राऊळ यांनी जाहीर केलं.
'मातोश्री'चे पाय धरल्याने अभिषेक घोसाळकरांचं निलंबन टळलं
अभिषेक घोसाळकर यांच्या वादानंतर शुभा राऊळ यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. मात्र इतर उमेदवार, कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं शुभा राऊळ यांनी स्पष्ट केलं.
..अन्यथा घोसाळकरांवर कारवाई : शिवसेना
खरंतर वॉर्ड क्रमांक 8 मधून (दहीसर) शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांना उमेदवारी हवी होती. पण शुभा राऊळ यांनी निवडणूक न लढवण्याचं जाहीर केल्याने घोसाळकर यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर
अभिषेक घोसाळकरांना शिवसेनेतून बडतर्फ करण्याचा निर्णय?
दरम्यान, वॉर्ड क्रमांक 1 आणि वॉर्ड क्रमांक 8 मधील वादावर मातोश्रीकडून पदडा पडला आहे. वार्ड क्र. 1 मधून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना तर वॉर्ड क्र. 8 मधून दीपा पाटील यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.
घोसाळकरांनी करुन दाखवलं, शिवसेनेच्या तीन नगरसेवकांवर गुन्हा!
"मी वॉर्ड क्रमांक 1 चा विद्यमान नगरसेवक आहे. शिवाय वॉर्ड क्र. 8 मधून निवडणूक मी लढवण्यास इच्छूक नाही. मी वॉर्ड क्र. 1 आणि 7 ची मागणी केली होती. त्यापैकी वॉर्ड क्रमांक 1 पत्नीला मिळाल्याने आता कुठलाही वाद नाही," असं स्पष्टीकरण अभिषेक घोसाळकर यांनी दिलं आहे.
प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, माजी महापौर शुभा राऊळ यांचं पत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement