एक्स्प्लोर
मी 1960 पासूनच्या सरकारला बोललो, अजित पवारांनाच का झोंबलं? राज ठाकरे
रविवारी पुण्यात वॉटरकप स्पर्धेच्या कार्यक्रमावेळी अजित पवारांनी राज ठाकरेंना बोलघेवड्याची उपमा दिली, त्यावर राज ठाकरेंनी आज प्रत्युत्तर दिलं.
ठाणे : मी सिंचनाबाबत वक्यव्य केलं, ते 1960 पासूनच्या सरकारला बोललो, मग तुम्हाला का झोंबलं, असा खोचक सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला. रविवारी पुण्यात वॉटरकप स्पर्धेच्या कार्यक्रमावेळी अजित पवारांनी राज ठाकरेंना बोलघेवड्याची उपमा दिली, त्यावर राज ठाकरेंनी आज प्रत्युत्तर दिलं.
राज ठाकरेंनी आज ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज ठाकरे काय म्हणाले?
दोन्ही सरकारचे नेते इथे हजर आहेत. गेल्या 60 वर्षातला सिंचनाचा पैसे कुठे गेला? जर 60 वर्षात इरिगेशन विभागात पैसा मुरला नसता तर राज्याची पाणी पातळी कमी झाली नसती, असं म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांसमोर फटकेबाजी केली.
दरम्यान, राज यांनी श्रमदानाला यावं अशी मागणी उपस्थित लोकांनी केली. त्यावर राज यांनी मिश्किल टिप्पणी केली. मी नक्की श्रमदानाला येईल. कुदळ कशी मारायची मला माहिती आहे, फावडे कसं मारायचं हे मला शिकवाल, असं राज ठाकरे म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement