एक्स्प्लोर
हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांची सर्रास लूट
नियमानुसार, ग्राहकाला विचारणा करुनच सेवा शुल्क हॉटेलमधील बिलावर आकारलं गेलं पाहिजे. पण हा नियम पायदळी तुडवत ग्राहकांची सर्रास लूट केली जात आहे.

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : हॉटेल बिलावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 12 टक्क्यांहून पाच टक्के करण्यात आला. मात्र हॉटेलच्या बिलावर जीएसटीसोबतच सर्व्हिस चार्ज म्हणजेच सेवा शुल्क आकारण्यात येत आहे. नियमानुसार, ग्राहकाला विचारणा करुनच सेवा शुल्क हॉटेलमधील बिलावर आकारलं गेलं पाहिजे. पण हा नियम पायदळी तुडवत ग्राहकांची सर्रास लूट केली जात आहे.
आपण मोठमोठ्या हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट्समध्ये जातो. मात्र, तुम्ही जर डोळे उघडून नीट पाहिलं, तर यातील काही हॉटेल्स, पबमध्ये हॉटेलच्या बिलावर तुम्हाला सर्व्हिस चार्ज लावून हे हॉटेलवाले तुमची लूट करत असल्याचं लक्षात येईल. हॉटेल बिलात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने केंद्र सरकारने जीएसटी 12 टक्क्यांहून पाच टक्क्यांवर आणला. पण तरीही सर्व्हिस चार्जच्या नावाखाली लूट सुरु आहे.
नियम काय सांगतो?
सर्व्हिस चार्ज देणं ग्राहकांना बंधनकारक नाही. मात्र, काही हॉटेल्समध्ये अशा प्रकारे चार्ज वसूल केला जात असेल तर तुम्ही ग्राहक म्हणून त्याला नकार देऊ शकता किंवा ग्राहक मंचात आवाज तक्रार करु शकता. हॉटेलने हा सर्व्हिस चार्ज लावण्यापूर्वी याबाबतची कल्पना ग्राहकांना मेन्यू कार्डवर द्यायला हवी, किंवा मग विचारणा अन्यथा फलक लावायला हवा. त्यानंतर ग्राहकाने हा सर्व्हिस चार्ज द्यावा की नाही हे ठरवणं गरजेचं आहे.
याआधीही सर्व्हिस चार्जच्या अनेक तक्रारी ग्राहक मंचाकडे आल्या आहेत. हा चार्ज बंधनकारक नाही, असं ग्राहक मंचाने सांगूनही वसुली सुरुच आहे. कारण, हा सर्व्हिस चार्ज या महागाईच्या काळात आपल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महत्त्वाचा असल्याचं हॉटेल मालकांचं म्हणणं आहे.
ग्राहकांना नियम माहित असला तरी त्याचा काही उपयोग नाही. कारण, हॉटेलवाल्यांकडून सर्व्हिस चार्ज हा वसूल केला जातोच. त्यामुळे सरकारनेच यासाठी कडक नियमावली बनवण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
