एक्स्प्लोर
Advertisement
फायर एनओसी सादर न करणाऱ्या ठाण्यातील 15 हॉस्पिटल्सना सील
अग्निशमन विभागाच्या कारवाईमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांनाही इतरत्र हलवावं लागल्याने त्यांचेही काही प्रमाणात हाल झाले आहेत.
ठाणे : फायर एनओसी सादर न करणाऱ्या ठाण्यातील हॉस्पिटलवर अखेर कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसांत ठाणे शहरातील 15 हॉस्पिटलला अग्निशमन विभागाच्या वतीने सील ठोकण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ज्या हॉस्पिटलला सील ठोकण्यात आलं आहे, त्यांची मान्यताही रद्द करण्यात येणार असल्याचं आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने ठाण्यातील रुग्णालयांवर ही कारवाई करण्यात आली आहे. अग्निशमन विभागाच्या या कारवाईमुळे फायर एनओसी सादर न करणाऱ्या इतर हॉस्पिटलचेही धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांनाही इतर हॉस्पिटलमध्ये हलवावं लागल्याने रुग्णांचेही काही प्रमाणात हाल झाले आहेत.
फायर एनओसी सादर न करणाऱ्या ठाण्यातील जवळपास 70 हॉस्पिटल्सना सील करण्याचे आदेश हायकोर्टाने ठाणे महापालिकेला यापूर्वीच दिले आहेत. नवी मुंबईतील रहिवाशी सपन श्रीवास्तव यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीमध्ये हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.
ठाणे महापालिकेने या सर्व हॉस्पिटल्सला 25 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर जी हॉस्पिटल्स फायर एनओसी सादर करणार नाहीत अशा सर्व हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याची घोषणा आरोग्य विभागाने केली होती. त्यानंतर काल आणि आज या दोन दिवसात अग्निशमन विभागाच्या वतीने शहरातील 15 हॉस्पिटल सील करण्यात आले आहेत.
यामध्ये मुंब्य्रातील 4, वागळे इस्टेटमधील 5, बाळकुममधील तीन आणि नौपाड्यातील तीन अशा 15 हॉस्पिटल्सचा समावेश आहे. तर या सर्व हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचं आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. ही हॉस्पिटल सील करण्यापूर्वी त्यांना 48 तासांची नोटीस देण्यात आली होती.
पालिकेने नोटीस दिल्यानंतर या सर्व हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले. ही सर्व हॉस्पिटल रिकामी झाल्यानंतरच त्यांना सील ठोकण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. अशाप्रकारची कारवाई करण्यासाठी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापना करण्यात आली असून ही समिती प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन आग प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत की नाहीत याची पाहणी करणार आहे. या उपाययोजना नसतील तर टप्प्याटप्य्याने कारवाई केली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement