एक्स्प्लोर
मुंबई पोलीस आणि रिक्षाचालकांची मुजोरी, हिंगोलीच्या डीवायएसपींची फेसबुक पोस्ट
ओळख न सांगता पोलीस महिलांची मदत करतात का ते पाहायचं होतं, पण पोलिसांनी मदतीऐवजी अपमान केला. महिला कधी सुरक्षित होतील, असा प्रश्न सुजाता पाटील यांनी फेसबुक पोस्टमधून उपस्थित केला.
![मुंबई पोलीस आणि रिक्षाचालकांची मुजोरी, हिंगोलीच्या डीवायएसपींची फेसबुक पोस्ट hingoli dysp sujata patil shared her bad experience with rickshaw in Mumbai मुंबई पोलीस आणि रिक्षाचालकांची मुजोरी, हिंगोलीच्या डीवायएसपींची फेसबुक पोस्ट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/26085633/sujata-patil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुजोर रिक्षाचालकां आणि मुंबई पोलिसांच्या उर्मटपणाचा अनुभव हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांनाही आला. मुंबईतील अंधेरी स्थानकावर आपण पोलीस असल्याची ओळख त्यांनी दाखवली नाही. त्यामुळे मुजोर रिक्षाचालक प्रवाशांसोबत कसे वागतात, याचा अनुभव त्यांना आला.
महिला प्रवाशांचा अपमान पोलिसांकडूनही कसा केला जातो, याची प्रचिती सुजाता पाटील यांना आली. समोर पोलीस बसलेले असतानाही रिक्षाचालक कसे वागतात त्याचा अनुभव आल्याचं सुजाता पाटील सांगतात. ओळख न सांगता पोलीस महिलांची मदत करतात का ते पाहायचं होतं, पण पोलिसांनी मदतीऐवजी अपमान केला. महिला कधी सुरक्षित होतील, असा प्रश्न सुजाता पाटील यांनी फेसबुक पोस्टमधून उपस्थित केला.
सुजाता पाटील यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात
''आज २४ march 2018.....सकाळी 15 तास प्रवास करुन भोपाळ ते मुंबई गाठली, पंजाब मेल ३ तास लेट होती. खुप थकले होते. पाय़ fracture . मुलगी आजारी जीव कासावीस झाला होता. लंगडत लंगडत बँगा ओढत सकाळी १० वा अंधेरी गाठली. अंधेरीत(प) नेहमीच रिक्षावाले प्रवाशाना छळवणुक करतात. नेहमीप्रमाणे रिक्षावाले भाडे नकार. कोणाला काही देणंघेण नाही. समोर पोलीस शिपाई १०० फूट खुर्चीत बसुन, हा सगळा उतमात पोलीसांसमोर सुरू. मी माझी ओळख सांगायची नाही ठरवलंच होतं. पोलीस चौकीत पोलीस मदत मागता पोलीस शिपाई धनवडे व शिर्के डि.एन.नगर पोलीस. आरामात बसुन. ईशारा केला पण पोलीस सांगतो येणार नाही. बॅगा ओढत चौकीत जावुन रिक्षावाले भाडे नाकारत आहेत सांगता , आँन duty वरील पोलीस शिपाई दोघानी १० मिनीटे उनमत बोलुन माझा भरभरुन अपमान केला. मला क्षणभर काहीच कळेना. एका प्रवाशी महिलेचा अपमान कशाप्रकारे केला जावू शकतो आज अनुभव घेतला. डोळे पानावले. अजूनही समजत नाही. महिला कधी सुरक्षीत होतील . .हा होता माझा आजचाएका प्रवासी महिलैचा कटु अनुभव. जयहिंद. .''
कोण आहेत सुजाता पाटील?
सुजाता पाटील या हिंगोलीच्या पोलीस उपअधीक्षक आहेत. कर्तव्यनिष्ठ आणि संवेदनशील पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. सांगलीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या मुलीचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं होतं. अनिकेत कोथळेची मुलगी प्रांजलच्या शिक्षणासह सर्व खर्चाची जबाबदारी घेण्याबाबतचं पत्र कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना लिहिलं होतं.
(रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुजोरपणाचा अनुभव तुम्हालाही आला असेल तर तो कमेंटमध्ये शेअर करा)
संबंधित बातमी :
हिंगोलीच्या डीवायएसपींनी अनिकेत कोथळेच्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)