एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतून मराठी माणूस हद्दपार, हिंदी भाषिकांची संख्या वाढली
इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस या संस्थेनं एक तुलनात्मक अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची मुंबई आता हिंदी भाषिकांचे शहर बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.
मुंबई : मुंबई आणि मराठी भाषा, मुंबई आणि मराठी माणूस या सर्वांवरचं आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पारंपरिक मतदार असलेला मराठी माणूसच मुंबई आणि उपनगरातून हद्दपार होतं असल्याचं उघड झालं आहे. तसेच ठाणे आणि रायगडमधूनही हद्दपार होत असल्याचं दिसून आलं आहे. तर त्या तुलनेत हिंदी भाषिकांचं प्रमाण वाढलं आहे.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस या संस्थेच्या तुलनात्मक अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची मुंबई आता हिंदी भाषिकांचे शहर बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. मागच्या काही वर्षात स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बदल होत आहेत.
VIDEO | मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात | स्पेशल रिपोर्ट | मुंबई | एबीपी माझा
2001 सालची जनगणना आणि 2011 सालच्या जनगणनेचा आधार घेऊन मुंबई, उपनगर, ठाणे आणि रायगडमध्ये हा अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार मुंबई शहरातून मराठी माणूस बाहेर फेकला जात आहे. तर त्या तुलनेत हिंदी भाषिकांचं प्रमाण मात्र 70 ते 80 टक्क्यांनी वाढलं आहे.
मराठी भाषिकांची आकडेवारी
2001 - मुंबई उपनगर - 32 लाख
2011 - मुंबई उपनगर - 33 लाख
2001 ते 2011 वर्षांमध्ये मराठी भाषकांमध्ये फक्त 3 टक्क्यांची वाढ
हिंदी भाषिकांची आकडेवारी
2001 - मुंबई उपनगर – 19 लाख
2011 - मुंबई उपनगर - 27.5 लाख
2001 ते 2011 वर्षांमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत तब्बल 43 टक्क्यांची वाढ
गुजराती भाषिकांची आकडेवारी
2001 - मुंबई उपनगर – 10.5 लाख
2011 - मुंबई उपनगर – 11 लाख
2001 ते 2011 वर्षांमध्ये गुजराती समाजाची 3 टक्क्यांची नाममात्र वाढ
उर्दू भाषिकांची आकडेवारी
2001 - मुंबई उपनगर – 11 लाख
2011 - मुंबई उपनगर – 10.5 लाख
2001 ते 2011 वर्षांमध्ये उर्दू भाषिकांची संख्या 3 टक्क्यांनी घसरली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement