एक्स्प्लोर

गणेश नाईक यांना हायकोर्टानं दिलासा; 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर

Ganesh Naik : गणेश नाईक यांना हायकोर्टानं दिलासा; 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर

Ganesh Naik : भाजप आमदार गणेश नाईक यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नाईकांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. एका महिलेनं  बलात्कार, आणि फसवणुकीचे आरोप केल्यानंतर गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ठाणे न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर गणेश नाईक यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. आता त्यांना हायकोर्टात दिलासा दिला आहे.

एका महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर भाजप नेते गणेश नाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाणे सत्र न्यायालयानं (Thane District & Sessions Court) नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात गणेश नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नवी मुंबईतील बेलापूर आणि नेरुळ इथे दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, अशी याचिका गणेश नाईक यांनी दाखल केली होती. या प्रकरणी सुनावणी करताना उच्च न्यायालयानं गणेश नाईक यांना जामीन मंजूर केला आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

गणेश नाईक यांच्यासोबत प्रेमसंबंध असणाऱ्या एका महिलेनं तब्बल 27 वर्षांनी बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल आहे. तर रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातही नाईक यांच्याविरुद्ध याच महिलेनं स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. नेरुळच्या गुन्ह्यासंदर्भात अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याचे या महिलेनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासही सुरुवात करुन या महिलेची वैद्यकीय चाचणीही केली. त्यानंतर नाईक यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला होता. ही सुनावणी न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्या न्यायालयात घेण्यात आली. 

माझ्या जीवाला धोका; गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या महिलेचा आरोप 

माझ्याह मुलाच्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य पीडित महिलेने केलं आहे. गणेश नाईक यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेचा आपल्या जीवाला धोका असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पीडित महिला आपल्या व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणाल्या, माझ्यासह मुलाच्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे कधीही बरे वाईट होऊ शकते. माझ्या अपहरणाची किंवा कधीही माझ्या हत्येचा कट रचण्याची शक्यता आहे. मला सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती मी करत आहे. मला सरकारकडून जे सहकार्य मिळाले त्यासाठी मी सरकारची आभारी आहे. मला आणि माझ्या मुलाला न्याय मिळेपर्यंत सर्वांनी मला असेच सहकार्य करा, अशी विनंती नाईकांवर आरोप करणाऱ्या महिलेनं केली होती. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Malegaon Mayor Election 2026: काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
Ritu Tawade: रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोठी बातमी : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Malegaon Mayor Election 2026: काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
Ritu Tawade: रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोठी बातमी : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येचा कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कटदाबी आहे का? तुम्ही अस्वस्थ का होताय? संजय राऊतांचा हल्लाबोल
मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येचा कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कटदाबी आहे का? तुम्ही अस्वस्थ का होताय? संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Shiv Sena: शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
Rohit Pawar and Ajit Pawar: अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Embed widget