एक्स्प्लोर

LIVE- पाऊस : मुंबई विमानतळावरुन 10 उड्डाणं रद्द

मुंबईला यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई: मुंबईला यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. पावसाचा जोर आणखी वाढला आहे. येत्या काही तासात आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 152 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढच्या काही तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
  • ठाण्यात वडिलांच्या हातून चिमुकली निसटली, कोरम मॉल शेजारी नाल्यात बूडू मृत्यू, तर कळव्यात एकाच कुटुंबातील तिघे वाहून गेले
  • मुंबई विमानतळावरुन 10 उड्डाणं रद्द, 7 विमानं वळवली, कार्गो विमानाच्या कार्यालयात पाणी
  • मुंबई उच्च न्यायालयात जवळपास 500 लोक अडकले. जेवणासाठी कोर्ट कॅन्टिनबाहेर 'स्टाफ'च्या रांगा, कोर्ट प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था
https://twitter.com/abpmajhatv/status/902564595012734977 https://twitter.com/abpmajhatv/status/902534715751534598 पावसाने उद्भवलेली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत मुंबई एण्ट्री पॉईंटवरील टोलवसुली बंद, सी लिंकवरही टोल नाही,मुख्यमंत्र्यांची घोषणा https://twitter.com/abpmajhatv/status/902534872001941506 https://twitter.com/abpmajhatv/status/902477289241186307 मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या तीनही मार्ग ठप्प झाले आहेत. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील ट्रॅकवर पाणी आलं आहे. LIVE- पाऊस : मुंबई विमानतळावरुन 10 उड्डाणं रद्द मध्य रेल्वेवर तर पुढील सूचना येईपर्यंत कोणत्याही दिशेला लोकल सुटणार नाही. तर हार्बर मार्गावर तर सीएसटीकडे निघालेली लोकल वाशीजवळ तासभर रखडली. त्यानंतर तीच लोकल पुन्हा मागे पनवेलला नेण्यात आली. याशिवाय पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे स्टेशनवर पाणी आलंच शिवाय तांत्रिक बिघाडही झाला. त्यामुळे तीनही रेल्वे मार्ग बंद झाले आहेत. सायन, परळ आणि कुर्ला स्थानकांच्या रुळांवर मोठं पाणी साचलं आहे. रस्त्यांवर गुडघाभर पाणी मुंबईसह उपनगरांना धुवाधार पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पुढच्या काही तासात पावसाचा जोर अजून वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. LIVE- पाऊस : मुंबई विमानतळावरुन 10 उड्डाणं रद्द मुंबईतील दादर, हिंदमाता, परळ, वरळी, जोगेश्वरी, अंधेरी, जेव्हीएलआर किंग सर्कल, वडाळा, कुर्ला बस डेपो जंक्शन, एलबीएस रोड, कुर्ला वेस्ट या भागात पाणी साचलं. तर अनेक भागात झाडं पडल्यामुळे रस्ते वाहतूक रखडली आहे. केईएम रुग्णालयात पाणी मुंबईत पावसाचा जोर इतका वाढलाय की जागोजागी पाणी साचलंय. मुंबईतल्या केईएम रूग्णालयातदेखील पाणी शिरलंय. त्यामुळे पावसाचा फटका आता रूग्णांनी देखील बसतोय. LIVE- पाऊस : मुंबई विमानतळावरुन 10 उड्डाणं रद्द रस्त्यावर गाड्या तरंगल्या सततच्या होणाऱ्या पावसानं मुंबईत जागोजागी पाणी साचलंय, लोकांची अक्षरश तारांबळ उडाली आहे... रस्त्यांवर बस आणि गाड्या अशरक्ष तरंगताना दिसतायत..त्यामुळे रस्ते वाहतुकीचेही तीनतेरी वाजलेत... विमानांची उड्डाणं रखडली रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसह मुंबईतील पावसाचा परिणाम विमानाच्या उड्डाणांवरही झाला आहे. अनेक विमानांची उड्डाणं रखडली आहेत. मुंबईतील दुपारच्या सत्रातील शाळा बंद पुढच्या काही तासात पावसाचा जोर वाढणार असल्यानं मुंबईतल्या दुपारच्या सत्रातल्या शाळा बंद राहणार आहेत. त्याचबरोबर दुपारनंतर स्कूलबस देखील धावणार नाहीयत. खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ते तुंबल्यानंतर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडतात. वरळीत असाच प्रकार घडल्यानं काही काळ वाहूतकीचा प्रश्न निर्माण झाला होता. पावसात बाहेर फिरताना लोकांनाही खबरदारीचं आवाहन केलं गेलंय. गणेश मंडळांचा वीजपुरवठा खंडीत करा       दरम्यान, गणेश मंडपाच्या आजूबाजूला किंवा परिसरात पाणी साचलं असेल, तर मंडळानं त्वरित वीजपुरवठा बंद करावा, असं आवाहन  बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं केलंय. एनडीआएरएफच्या तुकड्या तयार पावसाचा जोर पाहता एऩडीआरएफच्या तीन तुकड्या रेडी ठेवण्यात आल्या आहेत. तसंच पुण्यातून दोन तुकड्या बोलावल्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालयांना दुपारनंतर सुट्टी पुढील चार तासात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, हवामानाच्या अंदाजानंतर मंत्रालय आणि मुंबईतील सरकारी कार्यालयांना दुपारनंतर सुट्टी LIVE UPDATE
    • रस्त्यावर कुठेही अडकला असल्यास 100 नंबरवर कॉल करा किंवा ट्विटरवरुन कळवा, मुंबई पोलिसांचं आवाहन
    • परेलच्या केईएम रुग्णालयात पाणी
https://twitter.com/abpmajhatv/status/902476271602491393
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Washim Farmer News: अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Horoscope Today 14 January 2026 : आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या

व्हिडीओ

Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report
Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Farmer News: अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Horoscope Today 14 January 2026 : आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
KDMC Election 2026 BJP Vs Shivsena: डोंबिवलीत शिवसेना-भाजप राडा, पोलिसांकडून मध्यरात्री शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना अटक, हायव्होल्टेज ड्रामा
डोंबिवलीत मध्यरात्री हायव्होल्टेज राडा, शिवसेनेच्या उमेदवारांना पोलिसांनी हॉस्पिटलमधून उचललं, नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on Vadapav: देवेंद्र फडणवीसांच्या सभेतील 'त्या' एका वाक्यावरुन 'सामना'तून रान उठवलं, थेट महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यालाच हात घातला
देवेंद्र फडणवीसांच्या सभेतील 'त्या' एका वाक्यावरुन 'सामना'तून रान उठवलं, थेट महाराष्ट्राच्या स्वाभिमानालाच हात घातला
Embed widget