एक्स्प्लोर
तो पुन्हा येणार! विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा अंदाज
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पुढील काही तासांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भात हवामान विभागानं पावसाचा अंदाज दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद तर विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकाळी वाशिम, पुणे, हिंगोलीतील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तर, मुंबई, ठाणे, कल्याण भागावर ढगाळ वातावरणाचं सावट पाहायला मिळालं. सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाची हजेरी - कोल्हापूरमध्ये अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. हा पाऊस जवळपास अर्धातास बरसत होता. परिणामी रस्त्यावर पाणीच पाणी झाले. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे राज्यभर पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. आधीच अवकाळी पावसाने कंबरडे मोडले असल्याने त्यातून कसाबसा शेतकरी उभा राहत असताना पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी संकटात साडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागासह पश्चिम भागत हा अवकाळी पाऊस बरसला . या पाऊसामुळे द्राक्षबागांना फटका बसणार आहे. सूर्यग्रहणामुळे सकाळपासून सांगली जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या पूर्वभागातील तासगाव, मिरज तालुक्यात आणि पश्चिम भागातील वाळवा तालुक्यातील काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. या पाऊसामुळे द्राक्षबागांना पुन्हा मोठा फटका बसणार आहे. तर सांगली शहरातीलही काही भागात हा अवकाळी पाऊस पडला आहे. अवेळी पाऊस - यावर्षी पावसाळ्यात राज्यातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हातील काही भागांमध्ये कमी वेळेत जास्त पाऊस पडला. परिणामी पाऊस आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांना मोठा फटका बसला. या दोन्ही शहरांतून जवळपास 45 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हजारो जनावरे मृत्यूमुखी पडले. मालमत्तेची अपरिमत हानी झाली. अनेक संसार उध्वस्त झाले, तर अनेक रस्त्यावर आले. गेल्या काही वर्षांपासून देशात आणि राज्यात अवेळी पावसाचे प्रमाण वाढत चालले आहे. ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे. हेही वाचा - मुंबईत नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक Loan Waiver | शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची राजू शेट्टींची मागणी | ABP Majha
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























