एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक
म्हाडा आणि एसआरएला स्वतंत्र नियोजन प्राधिकरणाचा दर्जा बहाल करण्यात आल्यामुळे इमारतींना ओसी मिळविण्यासाठी या दोन्ही प्राधिकरणांना महापालिकेकडे यावे लागत नाही. आवश्यक त्या सोयीसुविधा देऊन इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच, संबंधित प्राधिकरण इमारतींना ओसी देते. तसेच पाणी जोडणीची परवानगीही बांधकाम प्रस्ताव सादर करतेवळी मुंबई महापालिकेकडून दिली जात असल्याने, म्हाडा आणि एसआरएच्या इमारतीतील सदनिकांचे वाटप केले जाते.
मुंबई : मुंबई मध्ये आता नव्याने बांधणाऱ्या येणाऱ्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था असणं बंधनकारक असणार आहे. नव्या इमारतींना परवानगी देताना आता म्हाडा आणि एसआरएने नव्या इमारतींमध्ये वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम असायला हवी. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम नसल्यास त्या इमारतींना पाणी जोडणी देण्यात येणार नाही.अशा स्वरूपाच पत्र मुंबई महानगरपालिकेने सर्व प्राधिकरणांना दिले आहे.
गेले कित्येक वर्ष मुंबई महानगर पालिकेने नियोजन प्राधिकरण म्हणून काम केलं आहे.परंतु आता महापालिकेसोबतच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण (एसआरए) ही नियोजन प्राधिकरण म्हणून काम करत आहे. त्यामुळे यापुढच्या काळात या दोन्ही प्राधिकरणांनी नव्या इमारतींना परवानगी देताना, त्यात रेन हार्वेस्टिंग देणे बंधनकारक केले आहे.
या संदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत असे निदर्शनास आले की, महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या परवानगीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुद्दा आहे. परंतु म्हाडा आणि एसआरएने बऱ्याच इमारतींना हार्वेस्टिंगशिवाय इमारतींना परवानगी दिल्या असून या नियमांना बगल दिली आहे. नव्याने परिपत्रक काढत ही बाब यापुढील काळात आवश्यक आहे. अन्यथा महापालिकेकडून पाणी जोडणी दिली जाणार नसल्याचे पत्र विभागीय आयुक्तांनी पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार प्रत्येक विभागवार आयुक्तांनी म्हाडा आणि एसआरएच्या बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेटंला हे पत्र पाठविले आहे. 2002 मध्ये महापालिकेने 1 हजार चौ. फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या बांधकामाला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी ) देताना संबंधित इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आहे की नाही याची शहानिशा करणे गरजेचे असून, रेन हार्वेस्टिंग नसलेल्या इमारतींना ओसी नाकारण्यात आल्या होत्या.
म्हाडा आणि एसआरएला स्वतंत्र नियोजन प्राधिकरणाचा दर्जा बहाल करण्यात आल्यामुळे इमारतींना ओसी मिळविण्यासाठी या दोन्ही प्राधिकरणांना महापालिकेकडे यावे लागत नाही. आवश्यक त्या सोयीसुविधा देऊन इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच, संबंधित प्राधिकरण इमारतींना ओसी देते. तसेच पाणी जोडणीची परवानगीही बांधकाम प्रस्ताव सादर करतेवळी मुंबई महापालिकेकडून दिली जात असल्याने, म्हाडा आणि एसआरएच्या इमारतीतील सदनिकांचे वाटप केले जाते. म्हणूनच यापुढे बिल्डिंग प्रपोजलसाठीची सादर करतानाच, या इमारतीच्या नकाशात रेन हार्वेस्टिंगची सोय केली आहे की नाही ही बाब तपासली जाणार आहे. अन्यथा त्यांना पाणीजोडणी दिली जाणार नसल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement