एक्स्प्लोर

ईव्हीएम तक्रारीबाबत निवडणूक आयोगाच्या जाचक नियमावलीविरोधात हायकोर्टात याचिका

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या नियमावलीला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार जर केलेली तक्रार चूक ठरली तर तक्रारदारालाच दहा हजार रुपये दंड आणि सहा महिने कारावास अशी शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे.

मुंबई : निवडणूक म्हटलं की ईव्हीएम मशिन आली आणि ईव्हीएम मशिन आली की आरोप आणि तक्रारही आले. मात्र ईव्हीएमबाबत तक्रार करण्याच्या तयारीत असलेल्यांनो सावधान. मतदानयंत्र आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबत केलेली तक्रार चुकीची ठरल्यास तक्रारदारालाच दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या नियमावलीला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार जर केलेली तक्रार चूक ठरली तर तक्रारदारालाच दहा हजार रुपये दंड आणि सहा महिने कारावास अशी शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे. अॅड. प्रकाश वाघ यांनी शुक्रवारी हायकोर्टात या नियमावलीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठापुढे ही याचिकेचा सादर करण्यात आली. मात्र यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत शनिवारी विशेष खंडपीठापुढे सुनावणी घेण्यासाठी रजिस्ट्रारकडे अर्ज करण्याची सूचना खंडपीठाने याचिकाकर्त्यांना केली. त्यामुळे पुढील आठवड्यात यावर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. मतदारांच्या मूलभूत अधिकारावर जाचक अटी लावण्यापेक्षा मतदानयंत्रांबाबत नागरिकांना विश्‍वासार्हता वाटेल आणि त्यामध्ये पारदर्शकता असेल असं वातावरण तयार करणं आवश्‍यक आहे. मात्र तसे न करता उलट तक्रारदारावरच कारवाई करण्याचा हा प्रकार अन्यायकारक आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये कोणतीही सूसूत्रता नसून नागरिकांच्या मूलभूत अधिकाराला बाधा आणणारी आहे. केवळ मतदान यंत्र किंवा व्हीव्हीपॅट मशिनबाबत शंका आली म्हणून जर एखाद्या मतदाराने तक्रार केली तर त्यासाठी त्या तक्रारदारालाच मानसिक-आर्थिक त्रास होईल, अशी जाचक नियमावली आयोगाने तयार केली आहे, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेत आसाममधील एका घटनेचा उल्लेख आहे. आसाममध्ये माजी पोलीस अधिकारी हरिकृष्ण डेका यांनी दिलेल्या मताऐवजी भलतेच नाव व्हीव्हीपॅटमध्ये आले होते. याबाबतची तक्रार करण्यास ते अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांना सांगण्यात आले की, तक्रार खोटी ठरल्यास तक्रारदाराला 10 हजार रुपये दंड आणि सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच तक्रार दाखल करण्यासाठी दोन रुपये भरावे लागतील, असेही सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Tukaram Mundhe : विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Embed widget