एक्स्प्लोर
Advertisement
I will get back to you, हॅकर मनिष भंगाळेचा एकनाथ खडसेंना इशारा
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ खडसेंनी दिलेल्या भाषणावरुन हॅकर मनिष भंगाळेने त्यांना दात-ओठ खात इशारा दिला आहे.
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करणारा हॅकर मनिष भंगाळेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मी पुन्हा तुमच्याकडे वळेन, मी अजूनही जिवंत आहे, अशा शब्दात भंगाळेने ट्विटरवरुन खडसेंना इशारा दिला आहे.
विरोधी पक्ष नेता म्हणून मी कायम पुराव्यांसह आरोप केले. कारण बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात हे मला माहिती आहे, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारला शालजोडे लगावले होते. त्यांच्या भाषणाच्या व्हिडिओची यूट्यूब लिंक शेअर करत भंगाळेने 'आय विल गेट बॅक टू यू सर, स्टील आय अॅम अलाईव्ह' असा इशारा दिला. मनिष भंगाळेने आपल्या ट्विटर अकाऊण्टवर 'राष्ट्रहितार्थ एथिकल हॅकिंग' करत असल्याचा उल्लेख केला आहे.
'सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांपैकी कोणीही नाही, पण बाहेरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले. दाऊदच्या बायकोशी मी बोलत असल्याचे संबंध जोडले गेले. दाऊदला सोडून तिला नाथाभाऊशी का बोलावं वाटलं, हे मला कळलंच नाही.' असं म्हणत खडसेंनी सभागृहात खसखस पिकवली होती. एटीएस आणि इतर यंत्रणांनी केलेल्या चौकशीत काहीच सिद्ध झालं नाही, हे कळल्यावर मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही बरं वाटलं, अशी मिश्किल टिपणीही खडसेंनी केली होती. याच भाषणावरुन भंगाळेने खडसेंना दात-ओठ खात इशारा दिला आहे. ईव्हीएम हॅकिंग प्रकरणी हॅकरवर विश्वास ठेवायचा नाही अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. मग माझ्यावेळी हॅकर मनिष भंगाळेवर कसा विश्वास ठेवला, असा थेट सवाल एकनाथ खडसेंनी स्वपक्षीयांना विचारला होता. मनिष भंगाळे नावाच्या कथित हॅकरनेही माझ्यावर आरोप केले होते. या हॅकरने माझे दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले होते. त्यावेळी कोणतेही तथ्य नसताना फक्त बातम्यांच्या आधारे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल उपस्थित करत एकनाथ खडसेंनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली होती. हॅकर मनिष भंगाळेने तीन वर्षांपूर्वी खडसे आणि दाऊद यांच्यात फोन संभाषण झाल्याचा आरोप केला होता. 2014 ते 2015 दरम्यान दाऊदने कोणाकोणाला कॉल केले होते, याची माहिती हॅकिंग करुन बाहेर आणल्याचा दावा केला होता. त्यात आढळलेल्या चार क्रमांकांपैकी एक हा खडसेंचा असल्याचं त्याने म्हटलं होतं. संबंधित बातम्या :I will get back to you sir on this ..still I am alive....https://t.co/H3NsjeIz9w @EknathKhadseBJP
— Manish Bhangale (@bhangale_manish) July 3, 2019
दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दाऊदला कॉल प्रकरणी खडसेंना पोलिसांचा दिलासा
खडसेंचा राजीनामा घेऊन चौकशी करा: प्रीती मेनन
‘दाऊद कॉल लॉगप्रकरणी खडसेंची चौकशी होणार’, प्रीती मेनन यांची माहिती
पैसे घेऊन आरोप करणाऱ्या दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार : खडसे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement