Manoj Jarange vs Gunaratna Sadavarte : लॉयल डॉग आज जत्रेत दिसतात, गुणरत्न सदावर्तेंची जहरी टीका, जरांगेंच्या सभेची चौकशीची मागणी
Manoj Jarange vs Gunaratna Sadavarte : "अखंड भारताचे मार्गविधाते नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांचा मी पाईक आहे. जरांगे पाटलांची सभा (Manoj Jarange Sabha ) हे केवळ एका यात्रेचं स्वरुप आहे. यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात", असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सडकून टीका केल्यानंतर एसटी कष्टकरी जनसंघाचे अध्यक्ष गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी उत्तर दिलं. "अखंड भारताचे मार्गविधाते नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांचा मी पाईक आहे. जरांगे पाटलांची सभा (Manoj Jarange Sabha ) हे केवळ एका यात्रेचं स्वरुप आहे. यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात", असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जरांगे पाटील यांना पाठींबा दिला आहे, असा दावा सदावर्तेंनी केला.
जरांगेंच्या सभेची चौकशी करा
आम्ही कुणाही पॉलिटीकल बॉसेसचे लॉयल डॉग नाहीत. असे लॉयल डॉग आज जत्रेत दिसतात. जे आरक्षण दिलं ते फडणवीसांनीच दिलं. ही शरद पवारांची आगपाखड आहे. आजची सभा नापास, नाकाम सभा आहे. या सभेची चौकशी झाली पाहिजे, शरद पवारांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
जरांगे पाटील यांची भाषा शिवराळ. एक मराठा लाख मराठा ही घोषणा सैन्याची, ही जातीची घोषणा नाही. ज्याप्रकारे पोलिसांना टार्गेट करण्यात आलं ही आगपाखड आहे. मला सायलेंट करण्यासाठी बोललं जातं, पण मी सायलेंट होणार नाही. जरांगेचे पॉलिटीकल बॉसेस वेगळे आहेत. जरांगेंनी त्यांच्या पॉलिटीकल बॉसेसला दाखवून दिलंय की ते किती लॉयल आहेत, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
आजची सभा लिटमस टेस्ट होती. माध्यमांना विनंती की इतर सभा बघाव्यात आणि मग आजच्या सभेला बिरुदं लावावीत, असा सल्ला सदावर्तेंनी दिला.
मनोज जरांगे काय म्हणाले?
दरम्यान, आज जालन्यातील आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल केला. "राज्यात उपमुख्यमंत्री खूप आहेत.एक म्हणतो मनोज जरांगेला अटक करा, मला अटक करणे सोप्पे आहे का? गुणवर्त सदावर्तेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समज द्यावी.
"एक टरमाळं मधीच उठलं आणि लागलं मागे, तोदेखील उपमउख्यमंत्र्यांचा कार्यकर्ता आहे, असं म्हणतात लोक. उपमुख्यमंत्र्यांनी येडपटं पाळलीत कशी, त्यात उपमुख्यमंत्री एक आहेत, ती एक पंचायत झाली. ते रात्री म्हटलं मला (जरांगेंना) अटकच करा. तो म्हणतोय मी हिंसा करेन, अरे मराठ्यांची औलाद हिंसा करणारी नाही. त्याला यश मिळवायचं होतं, त्यावेळी त्यानं एक मराठा, लाख मराठ्याची घोषणा दिलेली आझाद मैदानात, पण आता एक लाख मराठे एकत्र आलेत, तर तिथं सांगतो ते हिंसा करणार आहेत, त्याला अटक करा. मला अटक करणं सोप्पं आहे का आता?" , असं म्हणत मनोज जरांगेंनी गुणरत्न सदावर्तेंवर हल्लाबोल केला.