Manoj Jarange: भुजबळांवर हल्लाबोल, सदावर्तेही टार्गेट, सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम; जरांगेंच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे
मनोज जरांगेनी आपल्या भाषणात फडणवीसांना आणि भाजपला टार्गेट केलं. जरंगे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांच्या भाषणातील दहा मुद्द्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत
Manoj Jarange Speech 10 points : मनोज जरांगे (Manoj Jarange Spech) आज जालना (Jarange Jalna Speech) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात भव्य सभा पार पडली. जवळपास तासभर केलेल्या भाषणात सरकारवर सडकून टीका केली. एकंदर जरांगेनी आपल्या भाषणात फडणवीसांना आणि भाजपला टार्गेट केलं. जरंगे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांच्या भाषणातील दहा मुद्द्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत
माझी अंत्ययात्रा किंवा मराठा आरक्षणाची विजययात्रा निघणार (Manoj Jarange Last Ultimatum)
24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर आंदोलनाची पुढील दिशा 22 ऑक्टोबरला ठरवण्यात येणार आहे. नागी दिले तर पुढची जबाबदारी सराकराची आहे. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजययात्रा निघणार
मराठा समाज एकत्र होत नाही बोलणाऱ्यांना आजच्या गर्दीने उत्तर दिले ( Manoj Jarange On Crowd)
मराठा समाज एकत्र होत नाही हे बोलणाऱ्यांना आजच्या गर्दीने उत्तर दिले आहे. कोण म्हणते मराठा एक होत नाही सरकारला आजच्या गर्दीने उत्तर दिले आहे.
आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही (Manoj Jarange Maratha Resetvation Ultimatum)
घराघरातून मराठा या आरक्षणासाठी पेटून उठला आहे. मराठा समाजला आरक्षण दिलेच पाहिजे. उरलेल्या 10 दिवसांत मराठा आरक्षण जाहीर करा. जो सरकारतर्फे शब्द दिलाय त्या शब्दवर आम्ही ठाम आहे 40 दिवस दिले होते त्यामुळे अजून 10 दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर आम्ही तुम्हाला काही विचारणार नाही. जर तुम्ही आरक्षण दिलं नाही तर तुम्हाल दाखवू. आज सभेसाठी आलेला समाज शांततेत आलेल आहे. आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही.
मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र आणि ओबीसीतून आरक्षण द्यावे. (Manoj Jarange Kunabi Certificate)
गोरगरीब मराठ्यांना ओबीसीमध्ये समावेश करणयासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे. दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पाहण्याची आमची तयारी नाही. मराठा समाजासाठी स्थापन केलेली समिती आता बंद करा. मराठाच्या समाजाच्या लेकरांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. सराकराने तातडीने आरक्षण द्यावे. राज्यातील सर्वात मोठा समाजाची हालआपेष्ठ करू नका, केंद्राने आणि राज्याने मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र आणि ओबीसीतून आरक्षण द्यावे. मग विदर्भातील मराठा समाजाला शेती व्यवसायामुळे कुणबी जात प्रमाणपत्र दिलं. सरकारने सांगितलं होतं की गुन्हे मागे घेतले जाणार मात्र अजूनही झालं नाही.
मनोज जरांगेची छगन भुजबळांवर टीका (Manoj Jarange On chhagan bhujbal)
मनोज जरांगेनी छगन भुजबळांवर टीका केली आहे. मनोज जरांगे म्हणाले, आपला मराठा आरक्षणाला विरोध नाही त्यामुळे आम्ही टीका करणे बंद केले. काल म्हणाले सात कोटी खर्च आला आहे. येडपट आहे का विकत नाही सभेसाठी भाड्याने घेतले आहे. 100 एकर... येवलीच्या शेतकऱ्याने आम्हाला फुकट दिले आहे. तुला दिले नाही पण मला दिला. दोन वर्षे जाऊन बेसन खाऊन आला आहे. ज्या मराठ्यांनी मोठे खाल्ले त्यांचेच पैसे मंत्र्याने खाल्ले आहे. मराठ्यांनी घाम गाळून सभेसाठी पैसे उभारले आहे.अजित पवार त्याला समज द्या नाहीतर मी त्याच्या मागे लागलो तर त्याला सोडणार नाही
कोणी काहीही बोलले तर उद्रेक करू नका (Manoj Jarange Appeal to Maratha)
मराठ्यांना आलेली संधी वाया घलवू नका. कोणी काहीही बोलले तर उद्रेक करू नका जाळपोळ करू नका. मराठा शांततेत येऊन विजय प्राप्त करू शकतो. आतापर्यंत आंदोलन शांततेत सुरू आहे.
मनोज जरांगे सभा खर्च (Manoj Jarange On Sabha Expenses)
सभेची जागा शेतक-यांनी फुकट दिली आहे. सभेसाठी गाड्या देखील मराठ्यांनी आणल्या आहेत. आम्ही घाम गाळतो त्यातून हा निधी जमा केला आहे. महाराष्ट्रतला मराठा समाज निधी देणार होता. मात्र आम्ही 123 गावातून निधी गोळा केला
आणि त्यातून 21 लाख जमा झाले आहेत.
मराठ्यांना आरक्षण द्या मराठे डोक्यावर घेऊन नाचतील (Manoj Jarange Celebration )
मराठ्यांनी अंगावर घेऊ नका. मराठ्यांना आरक्षण द्या मराठे डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना आरक्षण दिले तर गुलालाचे ट्रॅक्टर दिल्लीपर्यंत येतील.
मनोज जरांगेची सदावर्तेंवर टीका ( Manoj Jarange on Sadavarte )
राज्यात उपमुख्यमंत्री खूप आहेत. एक म्हणतो मनोज जरांगेला अटक करा, मला अटक करणे सोप्पे आहे का असे म्हणत गुणवर्त सदावर्तेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समज द्यावी.
समितीचा, पुराव्याचा घाट घालू नका (Manoj Jarange Request to Government)
मराठा समाजाच्या वतीने माझी सरकारला विनंती आहे. समितीचा, पुराव्याचा घाट घालू नका. मराठा समाज आता सहन करू शकत नाही 24 तारखेनंतर मराठे मागे हटणार नाही. मराठे एकवटले आहे मराठ्यांना रोखणे आता शक्य नाही.
मनोज जरांगेंचा व्हिडीओ :