एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil Sabha LIVE : भुजबळ टार्गेट, मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा 22 तारखेला, मनोज जरांगेंचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा

Manoj Jarange Patil: मराठा समाज एक होत नाही, हे बोलणाऱ्यांना आजच्या गर्दीनं दाखवलं : जरांगे पाटील

Manoj Jarange Patil Sabha at Jalna LIVE : जालन्यातील (Jalna News) आंतरवाली (Antarwali) सराटीमध्ये (Sarati) आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेसाठी उपस्थित आहेत. 100 एकरच्या मैदानात मनोज जरांगेंची सभा आयोजित करण्यात आली होती. काल (शुक्रवारी) रात्रीपासूनच सभास्थळी मराठा आंदोलकांनी हजेरी लावली होती. 

मनोज जरांगे पाटील यांचं भाषण 

छत्रपती शिवाजी महाराज की... राष्ट्रमाता जिजाऊ माता की... मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो... घोषणांनी संपूर्ण सभास्थळ दुमदुमून गेलं आणि मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच जरांगेंनी व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना खाली पाठवलं आणि सर्वांना सारखा न्याय असं ठणकावून सांगितलं. जरांगे पाटील म्हणाले की, व्यासपीठावरचे सगळे खाली जा, सगळ्यांना सारखा न्याय बाकीचे खाली बसलेत आणि तुम्ही इथं वर, मग मी जाईन हा तिथं, मी मराठ्यांत जात असतो मग खाली... असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी सर्वांना व्यासपीठावरुन थेट खाली धाडलं. 

हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवरायांना वंदन करुन आणि उपस्थितांना प्रमाण करुन मनोज जरांगेंनी भाषणाला सुरुवात केली. मराठा समाज एक होत नाही, असं बोलणाऱ्यांच्या आज एकत्र जमून मराठ्यांनी मुस्काडात हाणली. कोण म्हणतो मराठा एक होत न्हाय... उपस्थितांनी एकत्र मनोज जरांगेंच्या सुरात सूर मिसळला.  

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागण्या पुन्हा एकदा मराठा आंदोलकांसमोर सांगण्यास सुरुवात केली. 

मनोज जरांच्या यांच्या प्रमुख मागण्या

  1. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा
  2. कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी 
  3. मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी
  4. दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या
  5. PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन , त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे

मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरी चालेल : जरांगे पाटील

महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरी चालेल. पण, इतर प्रवर्गांप्रमाणे हा प्रवर्ग टिकला पाहिजे, तरच ते आरक्षण आम्ही घेणार, 50 टक्क्यांच्या वर आम्ही आरक्षण घेणार नाही, असं मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितलं.

40 दिवसांपैकी 30 दिवस झालेत, 10 दिवस शिल्लक; जरांगेंकडून सरकारला मुदतीची आठवण

मनोज जरांगे बोलताना म्हणाले की, आज भाषण होणार नाही, आपल्या लेकराबाळांच्या भविष्याच्या मुद्द्याला आपण हात घालणार आहोत. आजचा मराठा समाजासाठी सुवर्णक्षण आहे. ऐतिहासिक सभेचा घराघरातला महाराष्ट्रातला मराठा समाज साक्षीदार झाला आहे. आज मराठा समाज गर्वानं म्हणणार आहे, मी माझ्या नातवासाठी, माझ्या मुलाच्या हितासाठी ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालोय, घराघरातला मराठा आरक्षण विषयासाठी पेटून उठलाय, आपल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीनं सरकारला विनंती आहे, तुमच्या हातात 40 दिवसांपैकी 30 दिवस झालेत, 10 दिवस शिल्लक आहेत. आज लाखोंनी आलेला जनसमुदाय जो उसळलाय, त्याचं एकच म्हणणंय, राहिलेल्या दहा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. माझ्या मायबाप मराठा समाजानं जो शब्द दिलाय त्यावर आजही ठाम आहे. 40 दिवस दिले, यामध्ये आम्ही एकही शब्द विचारणार नाही. तुमच्या हातात आणखी 10 दिवस आहेत, या 10 दिवसांत मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, जर तुम्ही नाही दिलं, तर मग 40 व्या दिवशी सांगू."

"गैरसोय झाली असेल तर माफ करा.. आपल्या लेकराबाळासाठी आतपर्यंत खूप सहन केलेय. आपल्या लेकरांना सुखात बघायाचं असेल तर थोडं सहन करा. गैरसोय झाली असेल तर माफ करा.. पण थोडं सहन करा. आता आपण मागे सरायचं नाही. मुलगा म्हणून सांगतोय. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे सरकारणार नाही.", असं मनोज जरांगे म्हणाले. 

10 दिवस झाल्यानंतर 4 दिवसांपेक्षा जास्त वाट बघण्याची आमची तयारी नाही : मनोज जरांगे 

"मराठा समाजासाठी गठीत केलेली समिती बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होतं.. एका महिन्यात महाराष्ट्रातील मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करा. देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्रीमंडळाला आणि राज्य सराकारला मराठा समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करुन सांगतो.. गोर गरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामाविष्ट कऱण्यासाठी केंद्राने आणि राज्याने तातडीने निर्णय घेऊन राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या... 10 दिवस झाल्यानंतर 4 दिवसांपेक्षा जास्त वाट बघण्याची आमची तयारी नाही.", मनोज जरांगे म्हणाले.

मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय गांभिर्याने घेऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करुन कुबणी प्रमाणपत्र द्या : मनोज जरांगे 

मनोज जरांगे म्हणाले की, "व्यावसायावर आधारित जाती निर्माण झाल्या. विदर्भातील मराठा बंधावांना शेती असल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र दिला. महाराष्ट्रातील शेतकर्यांचा व्यावसाय शेती आहे. त्यामुळे केंद्र सराकराला आणि राज्य सराकरला विनंती आहे, सर्वांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय गांभिर्याने घेऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करुन कुबणी प्रमाणपत्र द्या."

सात कोटींचा आरोप करणाऱ्या भुजबळांना जरांगेंचं मराठ्याच्या स्टाईलनं उत्तर, म्हणाले... 

"सरकारनं सांगितलं होतं की, गुन्हे मागे घेतले जाणार मात्र अजुनही झालेलं नाही, ते तातडीनं मागे घ्यावेत. आता नवा एक फॉर्मुला आला आहे. तो एकदिवस म्हणाला, आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही बुवा, आपल्या एकट्याच्याच मागे लागलेत. आरक्षणाला विरोध नाही म्हटल्यावर आपण बोलायला बंद केलं. पण कालपरवा तो परत फडफड करायला लागलाय. ते म्हणतंय, सात कोटी खर्च आलाय. अरे काय वावर घेतलंय का येडपटा... 100 एकर विकत नाही घेतलं, ते सभेसाठी घेतलं भाड्यानं. एका शेतकऱ्यानं फुकट दिलंय, येऊन विचार. तो म्हणतोय, लोक आता 10 रुपये देत नाहीत, अरे तुला देत नसतील. अरे तुला का देत नसतील तर, ज्या गोरगरिब मराठ्यानं तुला मोठं केलं, त्यांचंच रक्त पिऊन तू पैसा कमावला, त्यामुळे तुझ्याकडे धाड पडली, ज्यांचे पैसे खाल्ले आणि दोन वर्ष बेसन खाऊन आलास आत. आम्हाला शिकवतो पैसे कुठून आले? माझा मायबाप मराठा काबाडकष्ट शेतात करतो. आम्ही घाम गाळतो घाम. माझ्या मायबापानं घाम गाळून हजार, पाचशे रुपये जमा केले आहेत आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठ्यांची सेवा करण्याचं काम 123 गावकऱ्यांनी केलं आहे. तुझ्यासारखं नाही आमचं." , असं जरांगे म्हणाले. 

महाराष्ट्रतला मराठा समाज निधी देणार होता, जाहीर सांगतो. पण आम्ही सांगितलं, आम्हाला सेवा करायची आहे, एक रुपयाही नको. आम्ही 123 गावातून निधी गोळा केला आणि त्यातून 21 लाख जमा झाले. लगेच हिशोब घे म्हणावं त्याला सात कोटी वाल्याला. हे मराठ्यांना सांगणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी नाही, ते सात-आठ वेळा जाऊन आलंय, आणखी जायची वेळ आली त्याची परत, असं म्हणत छगन भुजबळांना जरांगेंनी सणसणीत टोला लगावला. 

जरांगेंनी भर सभेत छगन भुजबळांना थेट हिशोबच दिला

टोटल 21 लाख जमा झाले, 123 गावांतून 22 गावातल्या लोकांनी पैसे दिले, तेच 21 लाख झालेत, आपल्याकडे आणखी 101 गावं शिल्लक आहेत, त्यांच्याकडे पैसे जमा आहेत, पण ते आपण घेतलेले नाही, कारण हे आंदोलन पैशांसाठी नाही जनतेसाठी आहे, असं म्हणत जरांगे पाटलांनी संपूर्ण हिशोब जाहीर केला आणि भुजबळांना प्रत्युत्तर दिलं. पुढे जरांगे म्हणाले की, त्याला वावर घ्यायचं लागलंय वेड, ते घेतंय वावरं, पैसे खातंय जनतेचं, त्याला वाटलं सभेसाठी आपण वावरंच विकत घेतलं. ते म्हणतंय सात कोटी खर्च आला, पण कोटीच पहिल्यांदा ऐकलंय आम्ही. काय म्हणावं एवढ्या मोठ्या नेत्याला कळालं पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तुमच्या पक्षाचा आहे, त्याला जरा समज द्या. नाहीतर मी असा मागं लागंल, माझ्या नादाला लागलं तर मी सोडतंच नाही.

मनोज जरांगे म्हणाले की, "एक टरमाळं मधीच उठलं आणि लागलं मागे, तोदेखील उपमउख्यमंत्र्यांचा कार्यकर्ता आहे, असं म्हणतात लोक. उपमुख्यमंत्र्यांनी येडपटं पाळतील कशी, त्यात उपमउख्यमंत्री एक आहेत, ती एक पंचायत झाली. ते रात्री म्हटलं मला (जरांगेंना) अटकच करा. तो म्हणतोय मी हिंसा करिन, अरे मराठ्यांची औलाद हिंसा करणारी नाही. त्याला यश मिळवायचं होतं, त्यावेळी त्यानं एक मराठा, लाख मराठ्याची घोषणा दिलेली आझाद मैदानात, पण आता एक लाख मराठे एकत्र आलेत, तर तिथं सांगतो ते हिंसा करणार आहेत, त्याला अटक करा. मला अटक करणं सोप्पं आहे का आता?"

पंतप्रधान साहेबांनी फडणवीसांना समज द्यावी, कार्यकर्ते ते अंगावर घालू लागलेत : मनोज जरांगे 

"तुला एकदा मराठ्यांनी सूट दिली, तू मराठ्यांचं वाट्टोळं केलंस. मराठा आरक्षणाच्या विरोधात तू कोर्टात गेला आहेस, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याला समज द्या, तो तुमचा कार्यकर्ता आहे. मराठे अंगाव घेऊ नका, याच मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार दिलेत, केंद्रात, राज्यात सत्ता आणायला मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, पंतप्रधान साहेबांनी फडणवीसांना समज द्यावी, कार्यकर्ते ते अंगावर घालू लागलेत.", असं जरांगे पाटील म्हणालेत. 

"मी राज्याला, केंद्राला विनंती करतो, मराठा समाजाला आरक्षण द्या, हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना तातडीनं आरक्षण जाहीर करा, मराठे इकडं-तिकडं नाचण्यापेक्षा दिल्लीपर्यंत गुलाल घेऊन ट्रकच्या ट्रक घेऊन येतील. आम्हाला तुमच्या राजकारणाचं काही नाही करायंच, आम्हाला आमच्या लेकरांचं कल्याण करायचं आहे.", असं जरांगे पाटील म्हणाले. 

मनोज जरांगे पाटील यांचं भाषण लाईव्ह (Manoj Jarange Patil LIVE)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget