एक्स्प्लोर
भाजपच्या महिला शहराध्यक्षाच्या नातेवाईकाला हवेत गोळीबार महागात
ज्या बंदुकीतून त्याने गोळीबार केला होता, ती बंदूकही पोलिसांनी जप्त केली असून त्याचा शस्त्रपरवाना रद्द करण्याचा अहवाल पाठवण्यात आला आहे.
अंबरनाथ : भाजपच्या अंबरनाथ शहर महिला अध्यक्षा सुजाता भोईर यांच्या नातेवाईकाने देवीच्या मिरवणुकीत हवेत गोळीबार केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. आशिष भोईर असं या नातेवाईकाचं नाव असून त्याला हे प्रकरण चांगलंच महागात पडलं आहे.
या गोळीबाराप्रकरणी काल रात्री उशिरा अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी आशिष भोईरविरोधात सुमोटोने गुन्हा नोंदवला होता. यानंतर आज दुपारी आशिषला अटक करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. तसंच ज्या बंदुकीतून त्याने गोळीबार केला होता, ती बंदूकही पोलिसांनी जप्त केली असून त्याचा शस्त्रपरवाना रद्द करण्याचा अहवाल पाठवण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आशिष भोईर याच्याच परिवारातल्या काही जवळच्या नातेवाईकांना नुकतीच एका हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यानंतरही अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कुटुंबातल्या सदस्यांना बंदुकांचे परवाने मिळतातच कसे? असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement