एक्स्प्लोर
मुंबईत पोलिसांसाठी 25 ते 30 हजार घरं बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : घाटकोपरमध्ये पोलिसांसाठी स्मार्ट टाऊनशिप तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या.
पोलिसांसाठी स्मार्ट टाऊनशिप
मुंबईतील घाटकोपरमध्ये पोलिसांसाठी स्मार्ट टाऊनशिप तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या टाऊनशिपमध्ये आरोग्य, शिक्षणासंबंधी सर्व सुविधा असतील. पोलिसांसाठी देशात पहिलीच अशा प्रकारची टाऊनशिप असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पोलिस वसाहती दुरुस्त करणार
मुंबईत पोलिसांसाठी 25 ते 30 हजार घरं बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिस वसाहती दुरुस्ती करणार असून अनेक नव्याने घरं निर्माण करण्याचे प्रयत्नही सुरु आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पोलिसांना स्वतःच्या मालकीची घर कशी देता येतील, यासाठी योजना तयार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुंबईत 2 ऑक्टोबरपासून सीसीटीव्ही नेटवर्क सुरु करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवाय, निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळण्याची योजना सुरु करत असल्याचेही सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement