Republic Day 2021 | दिल्लीत धुमश्चक्री; ट्रॅक्टर परेडमधील 10 मोठ्या घडामोडी
दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमुळं एकच गोंधळ पाहायला मिळत आहे. एकिकडे दिल्लीत राजपथावर भारतीय सैन्यदलाचं पथसंचलन सुरु होतं, तर दुसरीकडे मात्र शेतकरी आंदोलनाला एक आक्रमक वळण मिळाल्याचं पाहायला मिळालं
Republic Day 2021 दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्याच दिवशी ट्रॅक्टर परेड काढणार असल्याचा निर्धार व्यक्त करत ही परेड अतिशय शांततापूर्ण मार्गानं काढण्यात येणार असल्याचं शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आलं. पण, अपेक्षित वेळेपूर्वी म्हणजेच राजपथावरील पथसंचलन पूर्ण होण्याआधीच शेतकऱ्यांच्या परेडला सुरुवात झाली आणि सुरुवातीला शांत वाटणारं वातावरण क्षणार्धातच बदलून गेलं.
1. मंगळवारी, देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सिंघू सीमा आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पोलिसांना झुगारुन लावत दिल्लीत प्रवेश केला. ज्यानंतर बराच वेळ हे शेतकरी मुकरबा चौक इथं थांबलेले होते. पण, मग त्यांनी बॅरिगेट आणि सीमेंटचे अवरोधक तोडण्याचा प्रयत्न केला.
2. शेतकऱ्यांनी दिल्लीत त्यांच्या प्रवेशबंदीसाठी केलेली सर्व बंधनं यावेळी झुगारून लावली. पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये यापूर्वी बवाना दिशेनं परेड करण्याबाबतची चर्चा झाली होती. पण, त्यानंतर हा मोर्चा दिल्लीच्याच दिशेनं निघाला.
3. मुकरबा चौकात पोलिसांनी बेभान शेतकऱ्यांना आळा घालण्यासाठी म्हणून पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला.
4.शेतकरी नेते, कक्काजी यांच्या माहितीनुसार निर्धारित मार्गावरुन जात असताना पोलिसांनीच त्यांना रोखलं. प्रशासनानं आपली भूमिका बदलण्यास नकार देताच शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
5. देशाच्या राजधानीच्या सर्व सीमांवर ट्रॅक्टरची गर्दी दिसली. ज्यांवर शेतकरी संघटनांचे ध्वज फडकवणयात आले होते. यामध्ये असणारे महिला आणि पुरुष ढोलाच्या तालावर नाचक होते.
#WATCH A protestor hoists a flag from the ramparts of the Red Fort in Delhi#FarmLaws #RepublicDay pic.twitter.com/Mn6oeGLrxJ
— ANI (@ANI) January 26, 2021
6. काही शेतकऱ्यांनी दिल्ली पोसील मुख्यालयाबाहेर जबाबदारी बजावणाऱ्या पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. काही वाहनांची तोडफोडही येथे करण्यात आली.
7. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतरही शेतकरी आंदोलकांनी अतिशय आक्रमक स्वरुपात लाल किल्ला गाठला. इथं त्यांनी मोठमोठ्यानं घोषणा देण्यासही सुरुवात केली.
8. पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळं आणि शेतकरी आंदोलकांची संख्या जास्त झाल्यामुळं हा गोंधळ झाल्याची माहिती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली.
9. शेतकऱ्यांचा जमाव आंदोलनस्थळी जाऊन तिथं पुन्हा एकदा ते शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करतील असा दावा टिकैत यांनी केला.
10. प्रजासत्ताक दिनाच्याच दिवशी देशात अशा प्रकारे अराजकता पसरवत आणि हिंसक मार्गाचा अवलंब करत शेतकऱ्यांची ही भूमिका आता या शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लावून गेली आहे.