एक्स्प्लोर

अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी

नियमांचे पालन न करणाऱ्या नियोक्त्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. 

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार रंगात आला असून 20 नोव्हेंबर रोजी 288 मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राजधानी मुंबईतील (Mumbai) 36 मतदारसंघातही त्याच दिवशी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सुटी देणे संबंधित नियोक्त्यांसाठी बंधनकारक राहील, असे आदेश काढण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या नियोक्त्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. 
 
माननीय भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या निर्देशांनुसार,  बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यामधील सर्व मतदारांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत. 

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे - 

• निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणतेही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा अन्य कोणत्याही आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी म्हणजेच बुधवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी सुटी द्यावी. 
 
• सर्व उद्योग समूह, महामंडळ, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना हा नियम लागू राहील. 
 
• या सुटीच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही. या नियमांचे किंवा तरतुदींचे कोणत्याही नियोक्त्याने उल्लंघन केल्यास त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल. 
 
• लोक प्रतिनिधित्व अधिनियम- १९५१ च्या कलम १३५ (ख) नुसार, एखाद्या मतदाराची नोकरीवरील अनुपस्थिती ही तो ज्या नोकरीवर असेल त्या नोकरीच्या संदर्भात धोकादायक किंवा हानिकारक ठरणार असेल, अशा कोणत्याही मतदारावर उल्लंघनात्मक कारवाई केली जाणार नाही. 
 
• तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, कर्मचारी, अधि कारी आदींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पूर्ण दिवसाची सुटी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान चार तासांची सवलत देता येईल. परंतु, अशाप्रकारच्या सवलत प्रकरणांमध्ये, जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. 
 
• सुटी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने एखाद्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नियोक्त्याविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल. त्यामुळे, उद्योग विभाग अंतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदी आस्थापनांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून दिलेल्या या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही श्री. गगराणी यांनी दिले आहेत.

हेही वाचा

पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : शेजाऱ्यांशी वादाच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
रागाच्या भरात 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Shreyas Talpade Case: 'पुष्पाभाऊ'ला अटक होणार? 'टोरेस' स्टाईलनं कोट्यवधी बळकावले, अभिनेत्यावर फसवणुकीचा गुन्हा
'पुष्पाभाऊ'ला अटक होणार? 'टोरेस' स्टाईलनं कोट्यवधी बळकावले, अभिनेत्यावर फसवणुकीचा गुन्हा
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: 15 दिवस उपाशी ठेवलं, हात-पाय पिरगळून तोडले, दत्तक घेतलेल्या चिमुकलीला निर्दयी जोडप्याने संपवलं; छत्रपती संभाजीनगर हादरलं
15 दिवस उपाशी ठेवलं, हात-पाय पिरगळून तोडले, दत्तक घेतलेल्या चिमुकलीला निर्दयी जोडप्याने संपवलं; संभाजीनगर हादरलं
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 07AM 28 March 2025Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरSpecial Report | Nashik singhasth Mahakumbh | नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक? वाद कधी मिटणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : शेजाऱ्यांशी वादाच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
रागाच्या भरात 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Shreyas Talpade Case: 'पुष्पाभाऊ'ला अटक होणार? 'टोरेस' स्टाईलनं कोट्यवधी बळकावले, अभिनेत्यावर फसवणुकीचा गुन्हा
'पुष्पाभाऊ'ला अटक होणार? 'टोरेस' स्टाईलनं कोट्यवधी बळकावले, अभिनेत्यावर फसवणुकीचा गुन्हा
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: 15 दिवस उपाशी ठेवलं, हात-पाय पिरगळून तोडले, दत्तक घेतलेल्या चिमुकलीला निर्दयी जोडप्याने संपवलं; छत्रपती संभाजीनगर हादरलं
15 दिवस उपाशी ठेवलं, हात-पाय पिरगळून तोडले, दत्तक घेतलेल्या चिमुकलीला निर्दयी जोडप्याने संपवलं; संभाजीनगर हादरलं
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकरला डिनरला दोन चपाती आणि भाजी, पण जेवण घशाखाली उतरलं नाही, वाचा नेमकं काय घडलं?
पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकरला डिनरला दोन चपाती आणि भाजी, पण जेवण घशाखाली उतरलं नाही, वाचा नेमकं काय घडलं?
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
Embed widget