एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना गिरीश महाजन यांचा फोन! जरांगेंनी कॅमेऱ्यासमोरच फोन स्पीकरवर टाकला

Manoj Jarange Patil : उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी फोनवरून संवाद साधत उपोषणाला न बसण्याचं आवाहन केलं.

Manoj Jarange Patil and Girish Mahajan : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सफोनवरून संपर्क केला. उपोषण करु नका, असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. तुम्ही एक महिना मुदत मागितली. तुमच्या शब्दाला मान देत आम्ही एक महिन्याऐवजी 41 दिवस दिले, आता अडचण काय आहे, आमचं काय चुकलं, असा सवाल जरांगे यांनी महाजन यांना केला आहे.

उपोपण करु नका, महाजन यांची विनवणी

समितीचा अभ्यास सुरू असून आरक्षण लवकरच मिळेल, काहीतरी सकारात्मक होईल, साखळी ठेवा मात्र आमरण उपोषण नका करू, असं म्हणत गिरीश महाजन यांच्याकडून जरांगेना विनवणी करण्यात आली. समितीचा अभ्यास 40 वर्षांपासून सुरूच आहे, मराठा आंदोलकांवरील खटले दोन दिवसात मागे घेतो, ते अजून मागे घेतलेले नाहीत, असं प्रत्युत्तर जरांगे यांनी महाजन यांना दिलं आहे. 

मराठ्यांवरील गुन्हे कधी मागे घेणार?

मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, तुम्ही म्हटले होते, अजून एकही गुन्हा मागे घेतलेला नाही. तुमच्याकडून तेही होत नाही आणि तुम्ही आरक्षण काय देणार, असा सवाल जरांगे यांनी महाजन यांना केला. आता 15 -16 जणांनी आत्महत्या केल्या त्याबद्दलही सरकारला काही सहानभूती नाही, आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदत करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्या, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. 

मनोज जरांगे पाटील आणि गिरीश महाजन यांची फोनवरून चर्चा : पाहा व्हिडीओ

आपण मार्ग काढू : गिरीश महाजन

तुम्ही उपोषण मागे घ्या, आपण मार्ग काढू, मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर आहे. देऊन टाका, देऊन टाका, असं आरक्षण देता येणार नाही. आम्हाला असं आरक्षण द्यायचं आहे, त्याला कुणीही चॅलेंज करु शकत नाही. न्यायालयात आव्हान देता येणार नाही. त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या, अशी विनंती महाजन यांनी केली. दरम्यान, आंदोलन उग्र करु नका, आत्महत्या करु नका, असं मराठा समाजाला आवाहन करण्याची मागणी देखील गिरीश महाजन यांनी केली आहे. 

सरकारला सहानुभूती नाही : जरांगे

तुम्ही 15 दिवस मागितले आम्ही 40 दिवस दिले, तुमच्या शब्द आम्ही पाळला. तुम्ही आमच्या लेकरांची जीवन कधीपर्यंत उद्धस्त करणार आहात. 16 मराठा बांधवांच्या आत्महत्यांबाबत सरकारला सहानुभूती नाही. त्यांच्या मागे त्यांच्या लेकराबाळांना मदत जाहीर करा, अशी मागणी जरांगे यांनी महाजन यांना केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Manoj Jarange : पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबाबत शंका, काहीतरी आत शिजतंय; मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special ReportABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 26 January 2024100 Headlines:  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
Embed widget