एक्स्प्लोर
मोबाईल दुरुस्तीच्या बहाण्याने सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार
भिवंडीत मोबाईल दुरुस्तीच्या नावाखाली दोन सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भिवंडी : भिवंडीत मोबाईल दुरुस्तीच्या नावाखाली दोन सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भिवंडीच्या जैतुनपूरा परिसरत ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या असून दोघा नराधमांचा सध्या पोलीस कसून शोध घेत आहेत. अराफत बहाउद्दीन, फिरोज शेख , नुदबीर रईस अशी तिघांची नावं आहेत. जैतुनपूरा, मंगलबाजार स्लॅब परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना दुरुस्तीच्या बहाण्यानं पाच जणांनी बलात्कार केला होता. त्यानंतर धमकी देऊन वारंवार दोघींना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी पीडित युवतींना ब्लॅकमेल करत पाचही नराधमांनी त्यांना एका लॉजवर नेलं. त्यानंतर त्यांनी दोन्ही बहिणींवर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, दिवसभर मुली घरी न परतल्याने त्यांच्या आईवडिलांनी मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना हा धक्कादायक प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत बलात्काराची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























