एक्स्प्लोर
सहाव्या मजल्यावरुन खाली पडल्याने चिमुकल्याचा जागीच मृत्यू
बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन खाली पडल्याने एका चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.
कात्रप भागातील सत्यम प्राईम इमारतीत ही घटना घडली. शिवांस यादव असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्याचं नाव आहे. शिवांस घरामध्ये खेळत असताना वडिलांची नजर चुकवून स्वयपांक घरात गेला.
गॅलरीतील अर्धवट रेलिंगवरुन खाली डोकावताना शिवांसचा तोल गेला आणि तो थेट खाली पडला. सहाव्या मजल्यावरुन खाली पडल्यानं शिवांसचा जागीच मृत्यू झाला. गॅलरीला संपूर्ण सुरक्षा ग्रील न बसवल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement