एक्स्प्लोर
अखेर वसईतील वादग्रस्त उड्डाणपुलाचं पाचव्यांदा उद्धाटन
वसईः वसईतल्या वादग्रस्त उड्डाणपुलाचं आज अखेर उदघाटन करण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते या पुलाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला. मागील नऊ वर्षांपासून या पुलाचं काम रेंगाळलं होतं. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.
पावसाने सुद्धा या उद्घाटनाला दमदार हजेरी लावली होती. त्यातच आता पर्यंत पाच वेळा या उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आलं होतं. ब्रिजचे काम पूर्ण होऊन महिना उलटला होता, तरी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उदघाटन रखडलं होतं. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांसाहित सर्वच राजकीय पक्षांनी अगोदरच या पुलाच प्रतिकात्मक उदघाटन केलं होतं.
पाच वेळा झालं उद्घाटन
- 15 जून रोजी नागरिकांकडून उद्घाटन
- 16 जून रोजी मनसे
- 17 जून रोजी जनआंदोलन समिती
- 18 जून राष्ट्रवादी काँग्रेस
- 25 जून पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते उद्घाटन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement